Uddhav Thackeray News : नरेंद्र मोदी शब्दांचे पक्के, पण...; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray On Narendra modi : पंतप्रधान मोदी एकीकडे आमच्यावर टीका करताना दुसरीकडे चर्चेचे दरवाजे खुले ठेवल्याचं सांगतात. पण...
Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 18 May : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावरून विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. भाजपच्या ( Bjp ) नियमानुसार 75 व्या वर्षावरील व्यक्ती सक्रिय राजकारणात राहत नाही. याचवरून आता शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना डिवचलं आहे. "मोदी शब्दांचे पक्के आहेत. त्यामुळे ते नक्कीच 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होतील. पण, 4 जूनला सरकार पडल्यानंतर भाजपचं काय होणार?" असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. एका वृत्तपत्रताला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, "पंतप्रधान मोदींना ( Narendra Modi ) फायदा न होणारी ही निवडणूक आहे. मोदी शब्दांचे पक्के आहेत. त्यामुळे 75 वर्षांचे झाल्यानंतर ते नक्कीच निवृत्त होतील. मात्र, 4 जूनला सरकार पडल्यानंतर भाजपचे काय होणार? मोदी निवृत्त झाल्यावर भाजपकडे चेहरा नसल्यानं या पक्षाचं काय होणार? म्हणूनच मोदी भाजपचे नेतृत्व करण्यासाठी अन्य पक्षांना डोळे मारत असावेत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे मोदीशिवाय दुसरा चेहरा नाही, एवढी नामुष्की या पक्षावर का आली? याचे कारण त्यांनी पक्षातील नेतृत्वच संपविलं आहे. पंतप्रधान मोदी एकीकडे आमच्यावर टीका करताना दुसरीकडे चर्चेचे दरवाजे खुले ठेवल्याचं सांगतात. पण, भाजपसोबत जाण्याची किंवा पुन्हा चर्चेची कोणतीही शक्यता नाही," असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

"आम्ही भाजपसोबत असताना बाहेर का ढकलले? अख्खी शिवसेना तुमच्यासोबत असताना तिला संपवायला का निघालात? भाजपबरोबर चर्चेचे कोणतेही प्रयत्न सुरू नाही. जनतेला संभ्रमित करून मते मिळवण्यासाठी मोदींचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जनतेला एकदा फसवू शकता. नेहमी मूर्ख बनवू शकत नाही. नमोरूग्ण, अंधभक्त विश्वास ठेवतील मात्र जनता या जाळ्यात फसणार नाही," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi News : 'शिवतीर्थ'वरील सभेआधीच मोदींचा 'मास्टर स्ट्रोक'; विरोधकांच्या प्रचाराचा 'तो' मुद्दाच गुंडाळला?

मोदी पुढील वर्षी निवृत्त होणार?

पंतप्रधान मोदींच्या वयावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भाजपला खोचक प्रश्न विचारला होता. "भाजपवाले 'इंडिया' आघाडीला विचारतात की त्यांचा पंतप्रधान कोण असेल. मी भाजपला विचारतो तुमचा पंतप्रधान कोण होणार? नरेंद्र मोदी असतील. पण, नरेंद्र मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होत आहेत. भाजपमध्ये मोदींनीची नियम बनवला होता की, पक्षात 75 वर्षांचा असेल त्याला निवृत्त केले जाईल. पुढील वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होतील. मी भाजपला विचारतो की तुमचा पंतप्रधान कोण होणार?" असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला होता.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi Vs Sharad Pawar : PM मोदींचं शरद पवारांना चॅलेंज! 'राहुल गांधींकडून वचन घ्या की...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com