INDIA Coordinator Committee : इंडिया आघाडीची समन्वय समिती स्थापन; महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा समावेश

Sharad Pawar And Sanjay Raut : लोकसभेसाठी २८ पक्षांतील १३ नेत्यांचा माध्यमातून इंडियात समन्वय
INDIA Leaders
INDIA LeadersSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी देशातील भाजप विरोधाकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवशीय बैठक पार पडली. मुंबईत झालेल्या तिसऱ्या बैठकीत इंडिया आघाडीसाठी १३ नेत्यांची समन्वय समितीच्या स्थापनेचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याही समावेश आहे. (Latest Political News)

इंडिया आघाडीत देशातील २८ पक्ष सहभागी झालेले आहेत. या पक्षांतील ६३ नेते मुंबईतील बैठकीला उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या एकमताने इंडियासाठी १३ नेत्यांची समन्वय समिती स्थापन केलेली आहे. यात शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे के.सी वेणुगोपाल, डीएमकेचे एम. के स्टॅलीन, राजदचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चड्ढा, जावेद अली खान, लल्लन सिंग, डी. राजा, ओमर अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती या नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

INDIA Leaders
Ajit Pawar On One Nation One Election: पंतप्रधान मोदींच्या 'वन नेशन-वन इलेक्शन'वर अजित पवारांची भूमिका काय ?

इंडियाचे संयोजक, समन्वय समिती निवडीसह लोगोचे अनावरण, लोकसभेची रणनीती आणि जागावाटपावर चर्चा होऊन काही महत्वाची निर्णय मुंबईत होणार होते. यामुळे या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले होते. यात एकमत झाले नसल्याने लोगोवर अंतिम निर्णय झाला नाही. यामुळे लोगोचे दिल्लीतून होणार असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे. हा लोगो कसा असणार, याबाबत कोणत्याही पक्षाच्या एकही नेत्याने कुठलीही माहिती दिली नसल्याने लोगोची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

INDIA Leaders
Eknath Shinde News : पक्ष सांभाळू शकले नाहीत, ते आघाडी काय सांभाळणार ? मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

संयोजकपदास काही नेत्यांनी नाकार दिल्याने इंडियातील पक्षांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे संयोजक नेमण्यापूर्वी ११ नेत्यांची समन्वय समिती स्थापनेवर मुंबईत निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता दोन जागा वाढवून ही समिती १३ नेत्यांची करण्यात आली आहे. या नेत्यांवर इंडियात सहभागी २८ पक्षांत समन्वय साधण्याची जबाबदारी असणार आहे. यात राज्यातील शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊतांचा सहभाग असल्याने मोदींविरोधात इंडियात कडवे आव्हान निर्माण करणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com