Eknath Shinde News : पक्ष सांभाळू शकले नाहीत, ते आघाडी काय सांभाळणार ? मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

Maharashtra Politics : त्यांना भष्ट्राचारावर बोलण्याचा अधिकार नाही.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे. "मोदी विरोधाने पछाडलेले एकत्र आले आहेत. बैठकीचे संयोजक स्वत:चा पक्ष सांभाळू शकले नाहीत, ते आघाडी काय सांभाळणार ? असे सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

"इंडिया आघाडीच्या नेत्यांची स्वार्थासाठी ही तडफड सुरु आहे. फक्त कुटुंबियांसाठी सगळी टोळी एकत्र आली आहे. त्यांना भष्ट्राचारावर बोलण्याचा अधिकार नाही. अशा आघाड्या अनेकवेळा झाल्या. फायद्यांसाठी अशा आघाड्या होत असतात," असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Hemant Soren News : मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ ; हेमंत सोरेन यांना तिसऱ्यांदा समन्स; चौकशीला हजर राहण्याचा ईडीचा आदेश

नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ८० टक्के नागरिकांनी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार, याला पसंती दिली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. '२०२४ मध्ये मोदीच येणार हे जनतेने ठरवलं आहे,' असे शिंदे म्हणाले.महायुतीच्या बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Sudhir More Death : रेल्वेखाली उडी घेऊन ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर ही बैठक होत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Rahul Gandhi
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court
Eknath Shinde Dasara Melava speech 2026
DCM Eknath Shinde News