Bawankule On Ajit Pawar : राष्ट्रवादीत अजित पवारांवर अन्याय : बावनकुळेंनी वात पेटवली

विरोधक असले तरी अजितदादांचे कर्तृत्व मान्यच केले पाहिजे.
Chandrashekhar Bawankule_Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule_Ajit PawarSarkarnama

Pune News : विरोधी पक्षनेते अजित पवारांवर (Ajit Pawar) अन्याय झाला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार २००४ मध्ये सर्वाधिक निवडून आले होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली नाही. विरोधक असले तरी अजितदादांचे कर्तृत्व मान्यच केले पाहिजे. प्रशासनावर त्यांचा वचक आहे. राज्याच्या विकासाचे नियोजन आहे. आमचे राजकीय विरोधक आहेत; पण त्यांचे काम आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजितदादांची मुक्त कंठाने स्तुती केली. (Injustice against Ajit Pawar in NCP: Chandrashekhar Bawankule)

बावनकुळे म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होतील, अशी भीती शरद पवारांना वाटली असेल. पक्षात आणि सरकारमध्येही तेच मुख्य झाले असते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही त्यांनी चांगले काम केले असते. पण, या दोघांची जोडी पवारांना पटली नसावी. अजित पवारांच्या कामाचे मी कौतुक करतो. आम्ही राजकीय विरोधक असलो तरी व्यक्तीगत विरोधक नाही.

Chandrashekhar Bawankule_Ajit Pawar
Solapur DCC Bank : मोहिते पाटील, सोपल, परिचारक, शिंदे बंधूंसह दिग्गजांना डीसीसीत ‘नो एन्ट्री’? चंद्रकांतदादांच्या काळातील ‘त्या’ कायद्याचा अडसर

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे शरद पवारांना कधीही वाटलं नाही. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत, यासाठी ते सर्वकाही करतील. भाजपकडूनसुद्धा फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत, असं त्यांना वाटतं. भाजपचे १०५ आमदार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आले. भाजप सर्वांत मोठा पक्ष फडणवीस यांनी केला. राष्ट्रवादीला कधीही ७० जागा निवडून आणता आलेल्या नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर भाजपचे सरकार १५ वर्षे जाणार नाही, हे पवारांना माहिती आहे. त्यांना कुठल्या कारणाने फडणवीसांचे नेतृत्व चालत नाही, यावर आज मी काही बोलत नाही. पण, फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत, असेच पवारांना वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

Chandrashekhar Bawankule_Ajit Pawar
Sharad Pawar News: महाराष्ट्राच्या विकासातील पवारांचे योगदान उलगडणार पाच खंड : पहिल्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

बावनकुळे म्हणाले की, शरद पवारांच्या संमतीशिवाय अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीचे पाऊल उचलले नसेल, असे मला वाटते. अमित शहा आणि शरद पवारांची भेट झाली काही नाही, हे मला माहिती नाही. त्याबाबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच बोलतील.

Chandrashekhar Bawankule_Ajit Pawar
Konkan News : सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिंदे गटात वाद पेटला : ‘केसरकरांची ऑफर नाकारली अन्‌ मला संपविण्याचा...’

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आम्ही जिंकणार याची आम्हाला खात्री आहे. राष्ट्रवादीने मतासाठी धार्मिक ध्रुवीकरण सुरू केले आहे. आमचं राजकारण विकासाच्या मुद्द्यावर आहे. प्रत्येक निवडणूक भाजप गांभीर्याने घेतो. शिवसेना आणि आमची नैसर्गिक मैत्री आहे. राज्य एकनाथ शिंदेच चालवत आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांना कधीच overpower करत नाहीत. पक्षादेश म्हणून फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत, असेही बावनकुळे म्हणाले. शिवसैनिक अस्वस्थ आहेत याची कल्पना उद्धव ठाकरे यांना दिली होती. आता त्यांचाशी चर्चा होत नाही. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आता चर्चा होत नाह, असेही त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com