Konkan News : सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिंदे गटात वाद पेटला : ‘केसरकरांची ऑफर नाकारली अन्‌ मला संपविण्याचा...’

तुम्हा सर्वांना पुरून उरणार एवढी ताकद माझ्यात आहे.
BJP-Shinde group
BJP-Shinde groupSarkarnama
Published on
Updated on

दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : ठेकेदारी हा माझा पहिला व्यवसाय आणि त्यानंतर मी राजकारणात आलो. ठेकेदारी व राजकारण या दोन्ही क्षेत्रातून माझी बदनामी करण्याचा खटाटोप शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) व त्यांच्या दोडामार्ग तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. मला संपविण्याचा जर त्यांनी विडाच उचललेला असेल तर मीसुध्दा कमी नाही. तुम्हा सर्वांना पुरून उरणार एवढी ताकद माझ्यात आहे, असा पलटवार भाजपचे (BJP) सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. (Dispute broke out between BJP-Shinde group in Sindhudurg)

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपाला म्हापसेकर यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘मी १९९० पासून ठेकेदारी व्यवसायात कार्यरत आहे. भाजपत मी १९९२ नंतर प्रवेश केला. राजकारणात असलो तरीही माझी ठेकेदारी मी लपविलेली नाही. मात्र, मला बदनाम करण्याचा डाव दोडामार्ग तालुक्यात आखला जात आहे. जी विकास कामे मी घेतली, त्यांना लक्ष करून उपोषण, आंदोलने करत मला नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र शिक्षण मंत्री दीपक केसरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आहे.

BJP-Shinde group
Kasba By Election : भाजपचे माजी आमदार परिचारकांचा कट्टर समर्थक पुण्यात करतोय काँग्रेसच्या धंगेकरांचा प्रचार

साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, अंकुश जाधव व आपल्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. केसरकर यांचे यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. पोटठेकेदार म्हणून मी या इमारतीचे काम करत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे काम संथगतीने चालले असले तरी आता पूर्ण झाले आहे. खोळंबलेली किरकोळ कामे देखील पूर्ण केली आहेत. उद्घाटनाची तारीख मंत्री केसरकर देत नसल्याने रखडले आहे. असे असताना मला मात देण्यासाठी जाणीवपूर्वक बदनामीचा डाव रचला जात आहे, असा आरोप म्हापसेकर यांनी केला.

BJP-Shinde group
Ratnagiri News : भाजप नगरसेविकांनी घेतली उदय सामंतांची भेट; रत्नागिरीत चर्चेला उधाण

म्हापसेकर म्हणाले की, ठाकरे गटाच्या बाबुराव धुरी व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक केंद्राचे उद्‌घाटन केले. हा प्रकार मी व धुरींनी संगनमताने घडवून आणल्याचे आरोप करण्यात आले. यात कोणतेही तथ्य नाही. आम्ही दोघेही राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने संगनमताचा विषय येतच नाही. याबाबत केसरकरांच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी तक्रार नोंदविली पाहिजे होती. पण, त्यांनी तसे का केले नाही? वन विभागाने झाडे तोडली नसल्याने मोर्ले-पारगड रस्ता रखडला आहे. माझा यात काडीचाही दोष नाही. उलट मी मातीकाम पूर्ण केले आहे.

BJP-Shinde group
Future CM Posters : माझे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स लावणाऱ्यांना पोलिसांनी शोधावे : सुप्रिया सुळे

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी....

मंत्री दीपक केसरकर यांनी दोन वर्षांपूर्वी मला शिवसेनेत बोलाविले होते. परंतु त्यांचा हा प्रस्ताव मी धुडकावून लावत भाजपात प्रामाणिकपणे राहिलो. याचा राग मनात ठेवून मला बदनाम करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना पुढे केले आहे. मला राजकारणातून बाजूला करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत; पण हे कदापि शक्य होणार नाही. एवढेच नाही तर हेवाळे ब्रिजचे व मला मिळणारी अनेक कामे त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून केसरकरांनी हिसकावून घेतली. स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा आरोप म्हापसेकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com