पिंपरी : यावर्षी २० एप्रिलला बदली झालेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आय़ुक्त आणि दबंग आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश (IPS Krishna Prakash) तथा के.पी यांच्या आईचे नुकतेच (ता.१९) नुकतेच निधन झाले. त्यामुळे हा खमक्या पोलिस अधिकारी खूप हळवा व भावूक झाला आहे. निस्सीम गणेशभक्त असलेली आई गणशोत्सवाच्या तोंडावरच सोडून गेल्याची भावनिक पोस्ट त्यांनी काल फेसबुकवर शेअर केली अन त्याला तसाच प्रचंड प्रतिसाद मिळाला.
के.पी यांची मुंबईत व्हीआयपी सुरक्षा प्रमुख (स्पेशल आय़जी)म्हणून बदली झाली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये असल्यापासून त्यांच्या मातोश्री आजारी होत्या. आई हा त्यांचा अत्यंत विक पॉंईट होता तिच्या जाण्याने कवीमनाचा हा दबंग आयपीएस अधिकारी मोठा हळवा झाल्याचे दिसून आले. त्यातही निस्सीम गणेशभक्त असलेल्या व शेवटच्या श्वासापर्यंत देवाधिदेव विघ्नहर्त्याची मुर्ती आपल्याजवळ ठेवणाऱ्या आईचे गणेशोत्सव आला असताना जाणे केपींना चटका लावून गेले. स्वामी तिन्ही जगााचा आईविना भिकारी असे म्हणत आई गेली अन मी भिकारी झालो, असे त्यांचे लगेच व्यक्त होणे सर्वकाही सांगून गेले.तर, काल त्यांनी फेसबुकवर गणेशोत्सव आला अन आई तू गेली,अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट करून दिली. शेवटच्या श्वासापर्यंत निस्सीम गणेशभक्त असलेल्या आईने गणपतीची छोटीशी मुर्ती आपल्याजवळ ठेवली होती,असे त्यांनी सांगितले.`मेरी मॉं के बराबर का कोई नही` हे त्यांचे व्यक्त होणंही आईचे महती पुन्हा एकदा अधोरेखित करून गेले.
जगातील सर्वात खडतर अशी ट्रायथलॉन स्पर्धा २०१८ ला जिंकून अल्ट्रामॅन किताब पटकावणारे केपी हे देशाच्या नागरी सेवेतील आणि वर्दीतील पहिले अधिकारी ठरले होते. तर, त्याअगोदरच्या वर्षी म्हणजे २०१७ ला त्यांनी आर्यनमॅन हा किताब सुद्धा पटकावला होता. हे दोन्ही पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते. त्यांनी नगर, सांगली,सोलापूर,पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी काम केलेले आहे. ते १९९८ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी झिरो टॉलरन्स ही मोहीम राबवली.त्यातून अवैध धंद्यांना चाप लावून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. २ सप्टेंबर २०२० ला पिंपरी आयुक्त म्हणून ते आले.अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली.त्यामुळे आतापर्यंतच्या चारही पोलिस आयुक्तांत त्यांचे काम अतिशय उजवे ठरले.तरीही त्यांची दीड वर्षातच मुदतपूर्व उचलबांगली आणि ती सुद्धा साईड पोस्टिंगला केली गेली.त्यामुळे त्याविरोधात तसेच त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी काही सामाजिक संघटनांनी आंदोलनही केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.