Maharashtra Politics : 'बाळासाहेब' ही काय त्यांची खासगी मालमत्ता आहे का? फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडेंना दिलं होतं.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Devendra Fadnavis News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आय़ोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. यावेळी ठाकरेंनी भाजपा व शिंदे गटाला बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडणुकीत उतरा असं खुलं आव्हान दिलं होतं. आता याच आव्हानाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्ष ही काय ठाकरेंची खासगी मालमत्ता आहे का? असा सवाल उपस्थित करत फटकारलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे, महाविकास आघाडीवर टीका केली.

फडणवीस म्हणाले, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेबांचे फोटो लावून प्रचार करण्यात आला होता. कुठे बाळासाहेबांचा फोटो मोठा तर, कुठे मोदींचा फोटो मोठा होता. पण बाळासाहेब ही काही त्यांची खासगी मालमत्ता नाही. शिवसेना पक्षही उद्धव ठाकरेंची खासगी मालमत्ता नाही. बाळासाहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते सर्वाचे आहेत, त्यामुळं त्यांचा फोटो कुणीही लावू शकतं अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उध्दव ठाकरेंना फटकारलं आहे.

Devendra Fadnavis
Pune News : मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ईडीच्या रडारवर; वाचा, काय आहे प्रकरण?

मला तुरुंगात टाकण्याचा डाव...

फडणवीस आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अटकवा असे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांना देण्यात आले होते. पण मी कोणतंही काम तसं न केल्यामुळे त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही.

Devendra Fadnavis
Nana Patole News; नाशिकमध्ये भाजपचे लोक हरवले काय?

उध्दव ठाकरेंसोबत माझं कुठलंही वैर नाही....

माझ्याकडून उध्दव ठाकरेंबद्दल कुठलीही कटुता नाही. मी राजकीयदृष्ट्या त्यांचा विरोधक नक्की आहे. आणि अतिशय ताकदीनं मी त्या्ंचा विरोध देखील करेल. पण उध्दव ठाकरेंसोबत माझं कुठलंही वैर नाही. मी त्यांच्यासोबत चहा घेऊ शकतो. गप्पा मारु शकतो. एका कार्यक्रमात रश्मी वहिनी मला भेटल्या. त्यांच्याकडे उध्दवजींच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच त्यांना माझा नमस्कार सांगा असंही म्हणालो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि त्याच्यापलीकडे मी कधीही जाणार नाही असंही फडणवीस म्हणाले होते.

उध्दव ठाकरे काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल तरीही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मतं मिळू शकत नाही. त्यांच्या फोटोशिवाय मतं मिळून शकत नाहीत. हे तुम्ही मान्य केलेलं आहात. हे मोदी यांना सुद्धा मान्य करावं लागलं आहे. मोदी का आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा.. का? असा सवाल करत हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com