IT चे छापासत्र सुरुच! शिवसेनेच्या आणखी एका बड्या पदाधिकाऱ्याच्या घरी कारवाई

Shivsena | Yashwant Jadhav | IT Raid | यशवंत जाधव यांच्याकडे तपासादरम्यान मिळालेल्या काही कागदपत्रांच्या आधारे हा छापा टाकण्यात आला असण्याची शक्यता
Yashwant Jadhav
Yashwant JadhavSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आज सकाळी आयकर विभागाने महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर आता आयकर विभागाने आपला मोर्चा शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याकडे वळविला आहे. आयकर विभागाने (Income Tax) यशवंत जाधव यांचे निटवर्तीय आणि माझगाव विभाग संघटक विजय लिपारे (Vijay Lipare) यांच्या काळाचौकीच्या घरी छापा टाकला असल्याचे खात्रीलायक वृत्त सरकारनामाच्या हाती लागले आहे. यशवंत जाधव यांच्याकडे तपासादरम्यान मिळालेल्या काही कागदपत्रांच्या आधारे हा छापा टाकण्यात आला असण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज सकाळी आज सकाळी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला आहे. शेल कंपन्यांमधील गुंतवणूक, कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप, जवळपास १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि हे पैसे युएईकडे वळते केल्याबाबत आयकरकडून जाधव यांची चौकशी करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. सोबतच आयकर विभागाच्या हाती पुरावे देखील दिले होते. जाधव यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी आयकर विभागाकडे पाठपुरावा करणार असून त्यांना मदत करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले होते.

Yashwant Jadhav
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची अडचण; यशवंत जाधव यांच्या घरी आयकरचा छापा

मात्र आता ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर यशवंत जाधव आणि विजय लिपारे यांच्या घरी छापेमारी झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोबतच किरीट सोमय्या यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या देखील नावांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता या छापा सत्रात पेडणेकर यांचा देखील नंबर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारशी संबंधित १२ जणांचा उल्लेख डर्टी डझन्स असा केला आहे.

Yashwant Jadhav
किरीट सोमय्या दिल्ली दौऱ्यावर; मलिक, जाधव यांच्यानंतर मोहिम केली आणखी तीव्र

कोण आहेत यशवंत जाधव?

यशवंत जाधव हे १९९७ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे २००७ साली ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ साली बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी त्यांच्यी निवड झाली. २०११ नंतर ते शिवसेनेचे उपनेते बनले. तर २०१७ मध्ये महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. एप्रिल २०१८ मध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. याशिवाय त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदार संघातून आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com