Mitkari Threatened Walse Patil : आमदार अमोल मिटकरींनी थेट वळसे पाटलांनाच दिली धमकी; नेमकं काय घडलं?

MLC Amol Mitkari : आमदार मिटकरी अन् शिवा मोहोड यांचा 'तो' वाद पुन्हा चव्हाट्यावर.
Amol Mitkari, Dilip Walse Patil and Others
Amol Mitkari, Dilip Walse Patil and OthersSarkarnama
Published on
Updated on

Akola District NCP Political News : अकोला जिल्ह्यात विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता पुन्हा या दोघांमधील वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. (MLA Mitkari and Shiva Mohod's 'it' controversy is again in the limelight)

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे बुधवारी (ता. 4) अकोला दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. याला कारण म्हणजे शिवा मोहोड यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीला आमदार अमोल मिटकरी यांनी वळसे पाटील यांच्यासमोरच तीव्र विरोध दर्शविला आहे. मिटकरींनी निवडीचा निषेध करीत थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची धमकीही दिली.

वर्षभरापूर्वी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार अमोल मिटकरींवर राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी थेट कमिशनखोरीचा आरोप केला होता. हा आरोपही पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर करण्यात आला होता. त्यानंतर दोघांमधील वाद अनेकदा माध्यमांतून उफाळून आला. एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.

आमदार मिटकरी यांच्याविरोधात महिलेचे प्रकरण, कमिशनखोरी आणि बेनामी संपत्ती असे अनेक गंभीर आरोप मोहोड यांनी केले होते. दरम्यान, वर्षभरानंतर पुन्हा या दोघांमधील वाद सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर उफाळून आला आहे. शिवा मोहोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश घेतला आहे. शिवा मोहोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करताच हा वाद चांगलाच उफाळून आला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवा मोहोड यांची निवड अन् वाद चव्हाट्यावर...

अकोल्यात काल राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हेदेखील उपस्थित होते. मेळाव्यात जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवा मोहोड यांची निवड जाहीर करताच आमदार मिटकरी यांनी या निवडीला जोरदार विरोध केला.

या पक्ष प्रवेशाला माझा विरोध असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोरच जाहीर केले. यावर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मध्यस्थी करीत सर्व निवडी या सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या मान्यतेनंतर होतील, असे जाहीर करीत पदाची निवड ही मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले. संघटनेची शिस्त ही सर्वांनी पाळावी, असे आवाहन ही त्यांनी केले. मात्र, यावर ही पद्धत नसल्याचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Amol Mitkari, Dilip Walse Patil and Others
शायरी म्हणत मिटकरींचं रोहित पवारांना उत्तर | Amol Mitkari On Rohit Pawar

मिटकरींनी निवडीचा थेट निषेध व्यक्त करीत जोपर्यंत मला विश्वासात घेतले जाणार नाही. तोपर्यंत ही निवड मानली जाणार नाही. या निवडीचा मी निषेध व्यक्त करतो आणि याची तक्रार मी अजितदादांकडे करीत असल्याचं म्हटलं आहे. या दरम्यान आमदार मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचेदेखील सूत्रांचे म्हणणे आहे.

काय आहे तो वाद?

वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर शिवा मोहोड यांनी थेट कमिशनखोरीचा आरोप चक्क पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केला होता. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला होता. या आरोपांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी

Amol Mitkari, Dilip Walse Patil and Others
Amol Mitkari News : अजितदादा २०२४ मध्ये मुख्यमंत्री होतील; अमोल मिटकरींचा विश्वास

आमदार अमोल मिटकरींनी सारे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर दोघांमधील वाद आणखी विकोपाला गेले. मिटकरी यांच्याविरोधात महिलेचे प्रकरण, कमिशनखोरी आणि बेनामी संपत्ती असे अनेक गंभीर आरोप शिवा मोहोड यांनी केले होते.

मिटकरी यांनी सर्व आरोप फेटाळत शिवा मोहोड यांना इशारा दिला होता. दोघांमधील वाद हे राज्यभर गाजले होते. मिटकरींनी व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांत शिवा मोहोडच्या विरोधात तक्रार दिली होती. दोघांमधील वाद वाढत असल्याने या प्रकरणात अजित पवार यांनी समेट घडवून आणल्याने हा वाद शांत झाल्याची चर्चा होती. मात्र, आता हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. त्यामुळे आता या वादाची चर्चा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासह सर्वत्र सुरू झाली आहे.

Edited By : Atul Mehere

Amol Mitkari, Dilip Walse Patil and Others
Akola Political News : आमदार देशमुख- भाजपमधील 'कोल्डवॉर'नंतर तक्रारकर्त्या सरपंचाचे 'हे' खळबळजनक आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com