Malvan Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj statue : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटेला अखेर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. रात्रीचा फायदा घेत पत्नी आणि आईला भेटायला कल्याण येथील राहत्या घरी आला असता त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती समोर आली आहे.
किल्लयावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे(Jaideep Apte) फरार झाला होता. या घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत.
जयदीप आपटेच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथकं रवाना केली होती. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कालच सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटे आणि सौरव अग्रवाल यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. आपटे परदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून ही नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर पुतळा कोसळल्याच्या घटनेला दोन आठवडे उलटल्यानंतर मुख्य आरोपी आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
दरम्यान, आपटे सापडत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awad) यांनीही सरकारवर निशाणा साधला होता. 'आपटे को पकडना सिर्फ मुश्किलही नहीं नामुनकिन है.' असे म्हणत आव्हाडांनी टीका केली होती. ज्या माणसाने एकही पुतळा साधा क्लेचाही बनवला नव्हता. त्याच्याकडे डिग्री नाही, असे आव्हाड म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.