Bawankule On Death Threat: धमकी देणं आमच्या रक्तात नाही, पवारांना धमकी देणाऱ्यांना जेलमध्ये टाका; भाजप प्रदेशाध्यक्षांची भूमिका

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar Death Threat: कोणत्याही पक्षाच्या नेत्याला धमकी देणे योग्य नाही.
Chandrashekhar Bawankule-Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule-Sharad PawarSarkarnama

Mumbai News: धमकी देणाऱ्यांना तत्काळ अटक केली पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला धमकी देणं योग्य नाही. धमकी देणं आमच्या रक्तात नाही. कुणीही असोत, त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. (Jail those who threatened Sharad Pawar: Chandrashekhar Bawankule)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला धमकी देणे योग्य नाही. धमकी देणं आमच्या रक्तात नाही. शरद पवार यांना धमकी देणाऱ्यांना तत्काळ अटक केली पाहिजे. कुणीही असोत त्याच्यावर कारवाई व्हावी. त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे.

Chandrashekhar Bawankule-Sharad Pawar
Kokan Loksabha : शिंदे गटाची धाकधूक वाढली; कोकणातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यावरही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसींचा नंबर एकचा शत्रू आहे. भुजबळ सोडले तर राष्ट्रवादीत ओबीसी नेत्यांना संधी नाही. नागपूरच्या शिबिरात ठराव करुन महाराष्ट्राचे किंवा राष्ट्रीय अध्यक्षपद ओबीसीला देतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्या सरकारमध्ये ओबीसीला काही मिळालं नाही.

Chandrashekhar Bawankule-Sharad Pawar
KCR In Maharashtra: महाराष्ट्रातील आठ ते दहा माजी आमदार ‘केसीआर’च्या संपर्कात; हैदराबादमध्ये मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा

ओबीसी जनता कदापी राष्ट्रवादीच्या मागे जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसीला न्याय देण्याचा विचार असेल तर महाराष्ट्राचे किंवा राष्ट्रीय अध्यक्षपद ओबीसीला द्यावं, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

भाजपने २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभेचे निवडणूक प्रमुख युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नेमले आहेत. आमच्यासारखीच ताकद आम्ही शिंदे यांच्या उमेदवारांसाठी लावण्यात येईल. विधानसभा, लोकसभा निवडणुक प्रमुख आम्ही निवडणूकीची तयारी करण्यासाठी केले आहेत. आम्ही २०० प्लस विधानसभा आणि ४० प्लस लोकसभा निवडून आणू. महाविकास आघाडीला परास्त करुन आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

Chandrashekhar Bawankule-Sharad Pawar
Pandharpur Politics: वडिलांनंतर... मुलालाही मुख्यमंत्र्यांनी पाठविले विमान; विजयदादांना पराभूत करणाऱ्या भारत भालकेंसाठीही चव्हाणांनी ‘प्लेन’ पाठविले होते

बानकुळे म्हणाले की, संजय राऊत हे सकाळी नॅरेटीव्ह सेट करुन दिवसभर बातमी चालवण्यासाठी करतात. संजय राऊत यांच्यावर आमदार नीतेश राणे बोलतील. तसेच, मुख्यमंत्री काही वेळ आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी गेले आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com