BJP Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजप ठाकरेंना धक्का देणार! शिंदेंचीही अडचण वाढवणार; इन्कमिंग सुरू, महापौरपदासाठी स्वबळाचे संकेत

Jatin Prajapati Join BJP Ravindra Chavan : जतिन प्रजापती यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्याचे स्वागत केले.
Jatin Prajapati Join BJP
Jatin Prajapati Join BJP sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : डोंबिवली-कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2017 मध्ये शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेतील फूटीमुळे शिवसेनेची ताकद दुभंगली आहे. मुंबई महापालिकेसोबत कल्याण-डोंबवली महापालिकीच्या निवडणुकीची तयारी भाजपकडून केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीतील असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळेच ठाकरेंना धक्का देण्यासाठी ते भाजपमध्ये इन्कमिंग वाढवत असून भाजपमधील नाराज नगरसेवकांची नाराजी देखील दूर करत आहेत.

कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे. असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याणात व्यक्त केले. येत्या पालिका निवडणुकीत भाजपा स्वाबळावर लढणार असे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. कल्याणातील सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे कल्याण मध्ये भाजपचे ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिदेंची शिवसेना महायुतीत आहे. कल्याण डोंबिवलीत त्यांची ताकद आहे. मात्र, शिंदेंनासोबत न घेता भाजप या निवडणुकीला स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याने शिंदेंचे टेन्शन वाढणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा झंजावात सुरू असून अनेक पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर कल्याणचा हा संपूर्ण परिसर आपल्याला भाजपमय करायचा असून त्यासाठी आपण सर्वांनी संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित काम करण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी केले.

Jatin Prajapati Join BJP
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंचं ‘वन टू का फोर’; मुंबईसाठी माजी नगरसेवकांच्या 'कुमक'ची जुळवाजुळव

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

कल्याणच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात जतिन प्रजापती हे एक मोठे नाव आहे. 2010 आणि 2015 मध्ये स्वबळावर अपक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकाने त्यांचा विजय निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांचा जनसंपर्क पाहता भाजपकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आणि अखेर आज जतिन प्रजापती यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला.

Jatin Prajapati Join BJP
"सभा लागल्या नाहीत म्हणून भास्कर जाधव वाचला!", सावली वादावरही रामदास कदमांची फटकेबाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com