Rahul Narvekar On 9 MLAs Petition : राष्ट्रवादीतील नऊ आमदारांच्या अपात्रतेवर राहुल नार्वेकर म्हणाले..

Maharashtra NCP Crisis : 9 जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली आहे.
Jayant Patil, Rahul Narvekar
Jayant Patil, Rahul Narvekarsarkarnama

NCP Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (ता.२) पुन्हा एकदा भूकंप झाला. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याच्यासोबत आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या अवघ्या दोन तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली.त्यानंतर आव्हाड यांनी त्या 9 जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

Jayant Patil, Rahul Narvekar
NCP Crisis : राष्ट्रवादीच्या संघर्ष काळात बाप-बेटे मैदानात ; प्रतीक पाटील कराडमध्ये तर..

या याचिकेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेर ते म्हणाले, "विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका सादर केलेली आहे. ती मी वाचून घेऊन. त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल. सभागृहातील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा निर्णय सभापती घेतात.यावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे विधानसभेच्या नियमांनुसार सर्व घटनात्मक तरतुदी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असेल,"

Jayant Patil, Rahul Narvekar
NCP Crisis : राष्ट्रवादीचे दोन प्रतोद ? ; व्हिप कुणाचा लागू होणार..

राष्ट्रवादी काँग्रेसमधील भूकंपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. बैठकांचा सिलसिला सुरु आहे. अजित पवार यांच्या 'देवगिरी'बंगल्यावर नऊ मंत्र्यांची बैठक सुरु आहे. आज मनसे, शिवसेनेचीही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे गटांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक होत असून खासदार, आमदार तसेच प्रमुख नेत्यांना बैठकीला हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Jayant Patil, Rahul Narvekar
Eknath Shinde : अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता ; मुख्यमंत्री शिंदे आज पुढील रणनीती ठरविणार..

शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली. त्यानंतर अजित पवार यांनी आज (सोमवारी) मंत्री अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि अनिल पाटील असे दोन प्रतोद झाल्याने व्हिप कुणाचा लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी 5 जुलै बैठक बोलावली आहे.

दोन्ही गट आपली ताकद दाखवण्यासाठी आपापल्या समर्थकांची जमवाजमव करीत आहेत. त्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांना सूचनाही दिल्या आहेत. या बैठकीचे निमंत्रणही दोन्ही गटाच्या नेत्यांना पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचा कोणता नेता कोणत्या गटासोबत आहे, हे दोन्ही बैठकांमधून स्पष्ट होणार असल्याचे मानले जात आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com