Amol Mitkari and Jayant Patil: पाया पडलेल्या अमोल मिटकरींची जयंत पाटलांनी घेतली शाळा; नेमकं काय घडलं?

Political News: जयंत पाटील आणि अमोल मिटकरी विधानसभेच्या पायऱ्यावर आले समोरासमोर
Amol Mitkari and Jayant Patil
Amol Mitkari and Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

NCP News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याने पक्षात दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही राष्ट्रवादीचे नेते आमने-सामने आले आहेत. कारण राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर एक गट विरोधी पक्षात आहे. मात्र, असं असंल तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आजही चांगले संबंध असल्याचा एक प्रसंग आज पाहायला मिळाला आहे.

अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या पायऱ्यांवर जयंत पाटील आणि अमोल मिटकरी हे आज समोरासमोर आले. यावेळी अमोल मिटकरी हे जयंत पाटलांच्या पाया पडले. त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चांही झाली. यावेळी दोघांनीही हसत-हसत एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. राष्ट्रवादीत फूट पडलेली असली तरी दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आजही जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं यावरून पाहायला मिळालं.

Amol Mitkari and Jayant Patil
Indapur politic's : राज्यात एकत्र आलेल्या भाजप-राष्ट्रवादीमध्ये इंदापुरात श्रेयवादाची लढाई

राष्ट्रवादीसोबत फारकत घेत सत्तेत जाऊन पंधरवडा झाला नसतानाही राष्ट्रवादीत अजूनही वेगवान घडामोडी घडत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांनी आणि पक्षाच्या आमदारांनी दोन वेळा शरद पवार यांच्याकडे चकरा मारल्या.

त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे असतानाच आज जयंत पाटील आणि अमोल मिटकरी विधानसभेच्या बाहेर पायऱ्यांवर समोरासमोर आले. यावेळी मिटकरी हे जयंत पाटलांच्या पाया पडले. यानंतर जयंत पाटलांनी मिटकरींबरोबर संवाद साधत त्यांची एक प्रकारे शाळाच घेतली.

Amol Mitkari and Jayant Patil
Sharad Pawar In Opposition Meeting : राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि ठाकरेही बोलले; पण पवारसाहेब बोललेच नाहीत...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचा एक गट सत्तेत तर एक गट विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र विधानसभेतच नव्हे तर राज्यात पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतरही दोन्ही गटातील नेत्यांचे आजही चांगले संबंध असल्याचे आज विधानसभेच्या पायऱ्यांवर पाहायला मिळालेल्या अमोल मिटकरी आणि जयंत पाटील यांच्या प्रसंगावरून दिसून येते.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com