Indapur News : इंदापूरचे राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याभोवतीच फिरत आहे. दोघांमध्ये शह-कटशहा, फोडाफोडी, कुरघोडीचे राजकारण रंगत असते. मात्र, अजित पवार आणि त्यांच्यासोबत आमदर भरणेही भाजपसोबत गेल्याने हे विळ्याभोपळ्याचे नाते आणि श्रेयवादाची लढाई संपेल, अशी चर्चा होती. मात्र, श्रेयवादाची लढाई अद्यापही कायम आहे. (BJP-NCP united in state; But Cridet Battle in Indapur)
अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबत ३५ ते ४० आमदारांचा एक गट भाजपसोबत जाऊन राज्याच्या सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्या बंडात इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी त्यांना पहिल्या दिवसांपासून साथ दिली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनीही पहिल्याच बैठकीत इंदापूरमधील जलसंधारणाच्या ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली, असा दावा भरणे यांनी केला आहे.
अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंदापूर तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी ३७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला, तर भाजपनेही २९ कोटी रुपयांचा निधी रस्त्याच्या कामासाठी मिळाल्याचे भाजपने सांगितले, त्यामुळे मिळालेल्या निधीवर भाजप आणि राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे.
दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिवसेना-भाजप युती सरकारकडून इंदापूर तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी २०२३ च्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या तरी ऐकी दिसत असली तरी इंदापुरात मात्र दोन्ही गटांतून विस्तवही जात नाही. दोन्ही गट कायम एकमेकांचे बळ अजमावून पाहत असतात. तसेच, श्रेयवादाची लढाई अद्याप सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.