Jayant Patil-Governor Meeting : राज्यपालांच्या भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले, राज्यात तणावपूर्ण परिस्थिती...

NCP Politics: जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली
Jayant Patil, Supriya Sule  -Governor Meeting :
Jayant Patil, Supriya Sule -Governor Meeting : X@ Supriyasule
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (ता.२९) राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषण आणि राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आले.

राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात जे आंदोलन सुरु आहे. याकडे राज्य सरकारने तातडीन लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी महाविकास आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रात जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस तरुणांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

Jayant Patil, Supriya Sule  -Governor Meeting :
Maratha Reservation : ''आरक्षण मिळत नाही तोपर्यंत, गावात नेत्यांना प्रवेश नाही'' ; नाशिकमधील तीन गावांचा निर्णय!

या परिस्थितीकडे राज्य सरकारने लक्ष दिलेले दिसत नाही. सरकारने जरांगेंना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला. असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. तसेच, वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांकडून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण झाला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यांना त्यांच्या न्याय्य हक्काचे आरक्षण देण्यासठी राज्यपालांनी राज्य सरकार आणि केंद्र सरसरकारशी संपर्क साधून आरक्षणासाठी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते मंडळीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परिस्थिती हळुहळु बिघडत चालली आहे. त्यासाठी राज्य सरकारने कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही.त्यामुळे राज्य पालांनी केंद्र सरकारशी संपर्क साधावा आणि या परिस्थितीची जाणीव करुन द्यावी. या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली.

उद्या महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत.आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, समित्या झाल्या, पण निर्णय काही झाले नाही. जरांगेंचीदेखील हीच खंत आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यावर निर्णय घेतला पाहिजे. अशी मागणी आम्ही करणार आहोत.

Edited By- Anuradha Dhawade

Jayant Patil, Supriya Sule  -Governor Meeting :
40 pc Export Duty on Onions : केंद्र सरकारला उशिराचं शहाणपण; कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क मागे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com