Jayant Patil News : '..हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केला आहे' ; जयंत पाटील यांनी केला आरोप!

Maharashtra Monsoon Session 2024 : महाराष्ट्राच्या माथ्यावर 94 हजार कोटींचा नवा भुर्दंड मारण्यात आला आहे, असंही जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : सध्या महराष्ट्राच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर दररोज नवनवीन राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली

जयतं पाटील(Jayant Patil) म्हणाले, 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब केलं. महाराष्ट्राच्या माथ्यावर 94 हजार कोटींचा नवा भुर्दंड मारण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केला आहे.'

Jayant Patil
Jayant Patil To Mahadev Jankar : जयंत पाटील यांनी महादेव जानकरांना थेट वंदनच केलं

याचबरोबर 'काल सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यापूर्वीही दोन बैठका झाल्या होत्या. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली होती. काल आरक्षणाच्या मथळ्याखाली बैठक बोलावण्यात आली होती. विधानपरिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने या बैठका घेणे अपेक्षित होते. तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही.' असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

याशिवाय ' सरकारने मराठा आणि ओबीसी(OBC) समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडे 206 आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचे काही कारण नाही.'

Jayant Patil
Nilesh Lanke : नीलेश लंके सरकारची डोकेदुखी वाढवणार; जयंत पाटील, सुप्रिया सुळे नगरला आंदोलनासाठी येणार

तसेच 'आजच्या पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य केलेल्या आहेत. 6 लाख 70 हजार कोटींचे एक बजेट मांडून, दुसऱ्या मिनिटाला 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. ही महाराष्ट्रात आर्थिक गोंधळ निर्माण करणारी प्रवृत्ती आहे.' अशी टीकाही केली गेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com