आमच्या दादा भुसेंना कोणत्या बंदरावर सोडलं, असं विचारताच, भुसेंनाही उभं राहाव लागलं!

Jayant Patil यांच्या कोपरखळ्यांनी सभागृहातील वातावरण हलकफुलकं झालं..
Jayant Patil-Dada Bhuse
Jayant Patil-Dada Bhusesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमधील अनेक मंत्र्यांची फिरकी घेतली. ठाकरे सरकारमध्ये कृषीसारखे चांगले खाते असलेल्या दादा भुसेंना (Dada Bhuse) बंदरे आणि खणिकर्म खाते दिल्याचा उल्लेख करत आमच्या दादा भुसेंना कोणत्या बंदरावर सोडलं, असा चिमटा जयंतरावांनी काढला.

या वेळी भुसे हे सभागृहात हजर होते. त्यांनी स्वतः जयंतरावांच्या प्रश्नाला उत्तर दिले. कृषीमंत्री असल्याने राज्यभर फिरावे लागत होते. तब्येतीच्या तक्रारीमुळे एवढी दगदग सहन होत नव्हती. त्यामुळे आधीसुद्धा ठाकरे यांनी मला दुसरे खाते द्या, अशी विनंती केली होती. त्यामुळे आता कृषी खाते मला मिळाले म्हणून मी नाराज नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. एकनाथ शिंदेही दादा भुसेंच्या मदतीला धावून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदरे आणि खणिकर्म या खात्यांना महत्व दिले आहे. म्हणूनच दादांना हे खाते दिल्याचे समर्थन त्यांनी केले.

Jayant Patil-Dada Bhuse
शिंदे-फडणवीस यांना त्यांच्याच दोन आमदारांनी अडचणीत आणले! एकाने सभागृहात; दुसऱ्याने बाहेर!

यावर छगन भुजबळ यांनाही फिरकी घेण्याचा मोह आवरला नाही. आमच्याकडे त्र्यंबकेश्वरला बंदरे फार आहेत. आता हे दादांना कोणतं बंदरे खात मिळालय, असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर अतुल भातखळकर यांनी भुजबळांना टोला लगावला. तुमच्याकडील कोणत्या मंडळींना बंदर आणि बंदरे यातील फरक माहीत नाही, असा सवाल विचारला.

बच्चू कडू हे माझ्या खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांना तुम्ही मंत्री करणार होता. पण तुम्ही त्यांना काहीच दिले नाही, याचीही आठवण जयंत पाटलांनी करून दिली.

जयंत पाटील यांनी या वेळी एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे या तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी खुली ऑफरही दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे म्हटले होते. त्यामुळे तो दगड मनावरचा काढून टाका आणि इकडे या. इकडे तुम्हाला मुख्यमंत्री बनायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही, असे आवाहन जयंतरावांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com