Jayant Patil Meet Narwekar : जयंत पाटील घेणार विधानसभा अध्यक्षांची भेट; राष्ट्रवादीतील डावपेचांना येणार वेग?

Jayant Patil Meet Narwekar : राष्ट्रवादी कुणाची नाट्याचा पुढचा अंक..
Jayant Patil Meet Narwekar :
Jayant Patil Meet Narwekar :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन गटातील संघर्षातून पुढे आलेले 'व्हीप'चे, पक्षविरोधी कारवायांतील निलंबनाचे पाऊल आणि त्यालरचे दाव्या प्रतिदाव्यांवर शरद पवारांचा गट आक्रमक झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाला शह देण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष जयंतत पाटील हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला जाणार आहेत. पाटील - नार्वेकरांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत नव्या राजकीय डाव खेळले जाऊ शकतात. (Latest Marathi News)

Jayant Patil Meet Narwekar :
Raju Shetti On Dada Bhuse: पालकमंत्री दादा भुसे आपलेच आश्वासन विसरले का?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षावर दावा करण्यासाठी दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पक्षावर दावा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी निवडणूक आयोगाकडे कायदेशीर चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आपणच आपणच खरे राष्ट्रवादी आहोत, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे जयंत पाटील यांच्या आजच्या भेटीकडे अनेक अर्थांनी पाहिले जात आहे.

अजित पवार गटातील नेत्यांवर शरद पवार यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई शरद पवारांच्या गटाकडून करण्यात आलेले आहे. तसेच, अजित पवारांना समर्थन दिलेल्या आमदारांपैकी १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Jayant Patil Meet Narwekar :
Kirit Somaiya Delhi Visit : विरोधकांच्या तक्रारीसाठी जाणाऱ्या किरीट सोमय्यांना आता दिल्लीत कुणी बोलवलं ?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांची व्हीप आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. यासंदर्भातल्या पुढील कारवाई अनुषंगाने, तसेच पक्षाचा व्हीप कोण? आणि पक्षविरोधी कारवाया केलेल्या नेत्यांच्या निलंबनासंदर्भात जयंत पाटील यांनी ही भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com