Jitendra Awhad : शरद पवारांना अचानक राबोडीत आणून आव्हाडांचे अजित पवार गटाला आव्हान!

Nationalist Congress News : राजकीय चर्चांण उधाण ; नजीब मुल्ला यांना शह देण्यासाठी आव्हाडांची खेळी असल्याचंही बोललं जात आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane news : राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. या फुटीनंतर एकेकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक ओळखले जाणारे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवारांना पाठिंबा देत, त्यांच्या गटात सहभागी झाले. त्यानंतर मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील आव्हाड यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. असे असताना दुसरीकडे रविवारी शरद पवार हे कल्याणच्या दौऱ्यावर जात असताना, त्यांचे ठाण्याच्या वेशीवर जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी थेट मुल्ला यांच्या राबोडी परिसरातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या निवासस्थानी भेट दिली. पवारांसाख्या मोठ्या नेत्याच्या या अचानक भेटीमुळे जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान दिले तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार हे रविवारी कल्याण, नवी मुंबई दौर्‍यावर होते. कल्याणला जाताना त्यांचे ठाण्याच्या वेशीवरील आनंद नगर चेकनाक्यावर फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशे, फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड होते. त्यानंतर पवार यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या निवासस्थानी भेट दिली.

ठाण्यातील राबोडी या भागात अनेक वर्षांपासून नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. पूर्वी नजीब मुल्ला हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे. तसेच ते अजित पवार यांचे देखील कट्टर समर्थक आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात फारसे सख्य नसल्याचे दिसून येत नव्हते. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट झाले. त्यातच नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर मुल्ला यांनी आव्हाडांवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली.

Jitendra Awhad
Ajit Pawar Pune Visit: दादांचा दौरा अन् सुट्टीचा वांदा; अजित पवारांच्या दौऱ्यासाठी अधिकारी सकाळपासून 'फिल्ड'वर

यातूनच, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा-मुंब्रा येथील आव्हाड यांच्या वर्चस्वाल सुरुंग लावण्यासही सुरुवात झाली. कारण, कळवा-मुंब्रा शहरातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यांना शिंदे गटात आणण्यात मुल्ला यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा देखील त्यावेळी रंगली होती.

Jitendra Awhad
Jarange Vs Bhujbal : ''जोडायची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही; हेकेखोरपणानं तुम्ही...'' जरांगेंचा भुजबळांवर पलटवार!

या सगळ्या घडामोडींनंतर आता आव्हाड हे शरद पवार यांनाच थेट मुल्ला यांच्या बालेकिल्ला असलेल्या राबोडीत घेऊन आले. शरद पवार येणार असल्याने राबोडी, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी भागात मोठ्याप्रमाणात फलकबाजी करीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. राबोडी भागात शहराध्यक्ष सुहास देसाई यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी भेट दिली. राबोडी भेटीचा कार्यक्रमामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

शरद पवार हे राबोडी भागात येणार असल्याचे कळताच भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोईर हे देखील सुहास देसाई यांच्या निवासस्थानी आले होते. मात्र गर्दी असल्याने त्यांना पवार यांची भेट घेता आली नाही. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना पाहण्यासाठी आल्याचे विक्रम भोईर यांनी स्पष्टीकरण दिले.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com