Jitendra Awhad PC : 'हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरूममध्ये लपायचे'; आव्हाडांनी सगळंच काढलं!

Jitendra Awhad On Ajit Pawar : "प्रफुल्ल पटेल सगळ्यात मोठा भाई..."
Jitendra Awhad PC
Jitendra Awhad PCSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांनी दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत सभा घेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी त्यांनी पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. यानंतर पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

Jitendra Awhad PC
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला हवा अल्पसंख्याकांचा 'विश्वास'; युवा मेळाव्यानंतर नजर अल्पसंख्याकांवर

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "अजित पवारांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष होण्यापासून कोणी रोखलं होतं? तुम्ही कायदेशीररित्या 2022 मध्ये पक्ष अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला पाहिजे होती, पण तुम्ही तर पक्षाच्या स्टेजवरनं नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली तर बाथरूममध्ये असायचात. कारण तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. या तुमच्या मर्यादा राज्याला माहिती नव्हत्या, आता ते लोकांना सांगावं लागेल. जेव्हा जेव्हा दिल्लीत भाषण करायची वेळी यायची तेव्हा तुम्ही बाथरूममध्ये असायचे. तरीही जे काही चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं, हा उपकार तरी मनात ठेवा. कृतज्ञता तरी व्यक्त करा."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "राज्यसभेच्या खासदारकीसाठी बरेच जण शर्यतीत आहेत. नाशिकच्या एका आमदाराला खासदार व्हायचं होतं, वंशाला दिव्याला खासदार व्हायचं होतं. पण शेवटी प्रफुल्ल पटेल यांना निवडण्यात आलं. पक्षातील भाई कोण तर प्रफुल्ल पटेल. आमच्याकडे असतानाही असंच होतं, आता तिकडेही तेच भाई आहेत. "

"पक्षात तुम्हाला अडवलं कोणी होतं? तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती, पण शरद पवार यांनी चुका पोटात घातल्या आणि तुम्हाला संधी दिली. एस.सी., एस.टी. आणि ओबीसी (OBC) या सगळ्यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. अजित पवारच सर्वात जातीयवादी माणूस आहे," अशा शब्दांत आव्हाडांनी घणाघात केला.

(Edited by - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com