Jitendra Awhad news: 'रात्रीचं दिसणारा माणूस महाराष्ट्राचा कृषीमंत्री'; आव्हाडांचा सत्तांरांवर हल्ला

Maharashtra Politics | गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
Jitendra Awhad |Abdul Sattar
Jitendra Awhad |Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad Criticized Abdul Sattar : अवकाळी पावसामुळे राज्याभरातील शेतकपिकांच मोठं नुकसान झालं आहे.राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी (२१ मार्च) नाशिकच्या निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. कृषीमंत्री येणार म्हणून शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. पण दुपारी येणारे कृषीमंत्री रात्री पोहोचले. रात्रीच्या वेळीच त्यांनी कुंभारी गावातील एका द्राक्ष बागेची पाहणी केली. पण त्यांच्या या पाहणी दौऱ्यावर आव्हाडांनी निशाणा साधला आहे.

“मंत्री अब्दुल सत्तार यांना रात्रीचं जास्त दिसतं. अशा शब्दांत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सत्तांरांना उपरोधिक टोला लगावला आहे. पण आपण भाग्यवान आहोत की, रात्रीचं दिसणारा माणूस हा महाराष्ट्राचा कृषीमंत्री आहे. दिवसा दिसलं नाही तरी चालेल, पण रात्र महत्त्वाची असते. हे सगळं हास्यास्पद आहे. अजूनही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले नाहीत. नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदतीचा एक रुपयाही मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कोणी विचारतही नाहीये.” अशी टीका त्यांनी केली आहे.

Jitendra Awhad |Abdul Sattar
Nandurbar news: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? अब्दुल सत्तारांनी दिले उत्तर

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीकपाणी हिरावले गेले आहे. शेतकरी सरकारकडे भरपाईची मागणी करत आहेत. या पाहणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. प्रामुख्याने अब्दुल सत्तार विरोधकांच्या निशाण्यावर होते. अशातच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचायला उशीर झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा सत्तारांवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com