Devendra Fadnavis: विधानभवन लॉबीत आव्हाड-पडळकर कार्यकर्त्यांचा राडा; मुख्यमंत्री 'अ‍ॅक्शन मोड'वर, विधानसभा अध्यक्षांचीही घेतली भेट

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar : विधानभवनाच्या लॉबीमध्ये माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते समोरा-समोर आले. त्यानंतर लॉबीमध्येच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधिमंडळात उमटले.
Devendra Fadnavis On Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpg
Devendra Fadnavis On Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद एकदमच विकोपाला गेला आहे.दोन्ही नेत्यांनी शिवराळ भाषेत एकमेकांना थेट आव्हान दिल्यानंतर आता विधानभवनाच्या लॉबीमध्येच पडळकर आणि आव्हाड यांच्यात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेचा नेतेमंडळींकडून तीव्र निषेध होत कारवाईच्या घडामोडीही वाढल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर कारवाईसंदर्भात थेट विधानसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.17) विधानभवन लॉबीत पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,घडलेली घटना अतिशय चुकीचं आहे.विधानभवन परिसरात अशी घटना घडणं बिलकुल योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अंतर्गत येतो,असंही त्यांनी म्हटलं.

त्यामुळे आपण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांची भेट घेतली.आणि त्यांनी या हाणामारीच्या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. मला असं वाटतं, इतक्या मोठ्या प्रमाणात इथं लोकं जमतात, आणि मारामारी करतात,हे विधानभवनाला बिलकुल शोभणारं नाही.म्हणून या घटनेतील दोंषीवर कारवाई ही झालीच पाहिजे, असंही फडणवीसांनी सांगितलं.

विधानभवनाच्या लॉबीमध्ये माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते समोरा-समोर आले. त्यानंतर लॉबीमध्येच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधिमंडळात उमटले.

Devendra Fadnavis On Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpg
Municipal Corporation Election: मोठी बातमी: अधिवेशन संपण्याच्या आधीच काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव; महापालिका निवडणुकीबाबत गंभीर आरोप

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विधानभवन परिसरात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड,जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे.

विधानभवनाच्या लॉबीतच आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त केला. त्यांनी विधिमंडळातच आमदार सुरक्षित नाहीत. असं असेल तर आमदार कशाला राहायचं? असा सवालही उपस्थित केला.

आव्हाड म्हणाले,अख्ख्या महाराष्ट्राला समजलं आहे की, पडळकरांच्या लोकांनी हल्ला केला आहे. आम्हाला यापेक्षा जास्त कोणताही पुरावा द्यायचा नाही.तुम्ही विधानपरिषदेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करत असतील तर आम्ही सुरक्षित नाही आहोत, असा त्याचा अर्थ होतो, आहे. तसेच मी सुरक्षित नसल्याचे ट्विट अगोदरच केलेले आहे.मला आई-बहिणीवर शिव्या देण्यात आल्या.तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली.कुत्रा,डुक्कर असं काहीही बोलण्यात आलं,असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केलाय.

एवढी सत्तेचा कोणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आई-बहिणीवरून शिव्या देतो तर अशा भाषेला अधिकृत भाषा म्हणून जाहीर कारा ना. सत्तेचा एवढा माज चढला आहे, अशी कठोर टीका आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाच्या लॉबीमधील दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.विधानभवनाच्या प्रांगणात सर्वसामान्यांना पासशिवाय सोडले जात नाही.पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्या ठिकाणी कसे आले? हा प्रश्न विचारला जात आहे. या लोकांना ज्यांनी पास दिले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com