पंकज रोडेकर
Mumbra News: प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून रोष ओढवून घेणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादी अजित पवार गटाने हाती घेतले आहे. त्यानुसार मुंब्रा परिसरातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला.
मुंब्र्यातील कार्यकर्त्यांच्या 'फिरसे आझादी'चे स्वागत करत असल्याचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी तर लवकरच मोठा मेळावा घेऊन मुंब्र्यात शक्तिप्रदर्शन करू, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. अशा प्रकारे मुल्ला आणि परांजपे यांनी आमदार आव्हाड यांना डिवचले आहे. आता आव्हाडांना दुहेरी पद्धतीने चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.
शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरच नाहीतर जिल्ह्यात शिवसेनेला सुरुंग लावले. यावेळी आमदार, माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये एकीकडे आव्हाड यांचे समर्थक अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांनी मुंब्य्रातूनच आव्हाडांना पहिला धक्का देत नवीन वर्षात सरप्राईज दिले तर नाही ना, अशी चर्चा आता ठाणे शहरात सुरू झाली आहे.
मुंब्य्रामधील शेकडो कार्यकर्त्यांनी विकासाच्या मुद्यावर पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जोडण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आनंद व अभिमान वाटतो. मुंब्य्रातील लोकांना आता पाणी, वीज, कचरा, साफसफाईवरून कोणी त्रास देणार नाही. विचारधारा व सेवा याच्यावर आधारित, मुंब्य्रात पुन्हा राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद उभी करू. लवकरच मोठा मेळावा घेऊन मुंब्य्रात शक्तिप्रदर्शन करू, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नवीन वर्षात दादागिरीला प्रेमाच्या संदेशाने उत्तर देऊ आणि मुंब्य्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी खिदमतगार असून मला एक कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा, प्रश्न तत्काळ सुटलेला असेल. मुंब्य्रातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या या फिरसे आझादीचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली.
सय्यद जावेद, आयतुलहक अन्सारी, जाफर मेमन, मोहसिन इब्राहिम शेख, सुलतान शेख, फैयाज खान, जैद सय्यद, जाकीर शेख, मोहसिन शेख, जावेद सय्यद, सुलतान खान, आमीन शेख, अनिस शेख, इफ्तिखार शेख, परवेश मलिक, एजाज शेख, मुक्तार अहमद, रफीक अन्सारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.