मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या कुटूंबियांच्या वारसांना नोकरी?

गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा बांधवांचा लढा सुरु आहे. दिवसेंदिवस हा लढा अधिकच तीव्र होत आहे.
Rajesh tope
Rajesh tope Sarkarnama
Published on
Updated on

जालना : मराठा आरक्षण (Maratha Arakshan) आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटूंबियांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Arakshan) बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या वारसांना राज्य सरकारकडून नोकरी देण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून नोकरी मिळणं गरजेचं आहे. या उमेदवारांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही राजेश टोपे म्हणाले.

Rajesh tope
काँग्रेसच्या उमेदवारामुळं विधान परिषदेच्या निकालाचा तिढा; उच्च न्यायालयात वाद

दरम्यान गेल्या आठवड्यातच राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाखांचं अर्थसहाय्य केलं होतं. यात कोणाकोणाला हे अर्थसाहाय्य दिले गेले त्यांची नावेही राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर केली आहेत. 'सतत पाठपुरावा केल्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला.बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आज 10 लक्ष रुपये मदत वितरित केली आहे,' असे ट्विट राजेश टोपे यांनी केलं होतं.

राज्य सरकारकडून आर्थिक मदर मिळणाऱ्या राज्यभरातील 34 कुटुंबियांमध्ये बीड जिल्ह्यातील 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, औरंगाबाद 6, जालना 3, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर 1 आणि परभणी जिल्ह्यातील 1 अशा कुटुंबाचा समावेश आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com