बिबट सफारीवरुन जुन्नरमध्ये आजी-माजी आमदारांच्या डरकाळ्या

जुन्नरच्या बिबट सफारी संदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला फोन केला होता. मात्र बघू, करू यावर माझा विश्वास नाही.
Atul Benke Sharad Sonawane News, Junnar leopard safari News
Atul Benke Sharad Sonawane News, Junnar leopard safari News sarkarnama
Published on
Updated on

नारायणगाव : जुन्नरच्या बिबट सफारीवरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. आमदार अतुल बेनके (Atul Benke)यांनी या बिबट्या सफारीचा सर्व्हे सुरु झाला असल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane)यांनी बिबट सफारीला मंजुरी मिळाली, सर्व्हे सुरू झाला हे आमदार बेनके यांचे सर्व थोतांड असल्याचे म्हटलं आहे. (Atul Benke Sharad Sonawane News)

''जुन्नरच्या बिबट सफारी संदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला फोन केला होता. मात्र बघू, करू यावर माझा विश्वास नाही. जुन्नरच्या बिबट सफारी मंजुरीचा सरकारचा लेखी आदेश येईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. बिबट सफारीसाठी मी बलिदान करायला तयार आहे,'' अशी ठाम भूमिका माजी आमदार शरद सोनवणे यांनी स्पष्ट केली.

Atul Benke Sharad Sonawane News, Junnar leopard safari News
लांडगेंची जोरदार बॅटिंग ; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला साकडे

माजी आमदार सोनवणे म्हणाले, ''मी आमदार असताना सन २०१६-२०१७ मध्ये बिबट सफारीसाठी आंबेगव्हाण येथे जागेची पाहणी, सर्व्हे मुख्य वनसंरक्षक यांनी केली. त्यानंतर आराखडा तयार करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी सीएसआर फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे पत्र दिले.

मात्र दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. निधी अभावी परिपूर्ण अहवाल तयार झाला नाही. हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी मागील तीन वर्षे आमदार बेनके यांनी प्रयत्न केले नाहीत. मी या बाबत पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे १९ वेळा प्रस्ताव पाठवला आहे. बिबट सफारीला मंजुरी मिळाली, सर्व्हे सुरू झाला हे आमदार बेनके यांचे सर्व थोतांड आहे,''

Atul Benke Sharad Sonawane News, Junnar leopard safari News
ठाकरे सरकारचा युटर्न ; आमदारांना मोफत घर नाही, आव्हाडांचे स्पष्टीकरण

बिबट सफारी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत आमदार अतुल बेनके यांची २१ मार्च रोजी बैठक झाली. २२ मार्च पासून जुन्नरच्या बिबट सफारीसाठी माजी आमदार सोनवणे यांनी जुन्नर येथे उपोषण सुरू केले आहे. तर वनविभागाने गुरुवारी (ता.२४) बिबट सफारीची जागा निश्चित करण्यासाठी तालुक्यातील चार गावांचा प्राथमिक सर्व्हे केला.

सरकारच्या आदेशानुसार बिबट सफारीचा सर्व्हे सुरू झाला आहे. पुरवणी मागण्यात बिबट सफारीसाठी निधी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री ठाकरे यांनी मान्य केले असताना माजी आमदार सोनवणे यांनी सुरू केलेले उपोषण हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप आमदार बेनके यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात पालकमंत्री पवार यांनी हा प्रकल्प बारामतीला पळविला. पवार यांनी जुन्नरच्या जनतेवर अन्याय केला आहे. मी जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केला. बिबट सफारी माझा पायलट प्रोजेक्ट आहे. जोपर्यंत शासन राज्यातील या एकमेव पायलट प्रोजेक्टला लेखी मंजुरी देत नाही. तो पर्यत मी हटणार नाही. तालुक्यासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे.

दरम्यान बिबट सफारीच्या मागणीसाठी व माजी आमदार सोनवणे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी तालुका प्रमुख माऊली खंडागळे , सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा येथे आंदोलन झाले. या मुळे नगर- कल्याण व पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com