Kalayn Lok Sabha Election News : कमळावरच लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह; डॉ. श्रीकांत शिंदेंची डोकेदुखी वाढणार

Political News : एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने येत्या काळात या मतदारसंघातील तिढा वाढतच जाण्याची शक्यता आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dombavali News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर असलेली शिवसेना व भाजप पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत धुसफूस याच मुद्द्यावरूनच कल्याण लोकसभा मतदारसंघात चव्हाट्यावर आली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने येत्या काळात या मतदारसंघातील तिढा वाढतच जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेले ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपला देण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या चिरंजीवाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ अबाधित राखणे व तो पुन्हा जिंकून आणणे म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे.

Shrikant Shinde
Uddhav Thackeray News : एकनाथ शिंदेंच्या टीकेवर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, थेट शिंदेंच्या देशभक्तीवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व या मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा असून, उमेदवारीची माळ डॉ. शिंदे यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्हे आहेत. खासदार शिंदे यांना तिकीट मिळवण्यासाठीदेखील मित्रपक्षातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यातच आता दिवा भाजप मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असून, शिंदे यांच्यापुढे आणखी एक आव्हान उभे केले आहे.

कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उघड-उघड नाराजी दिसून आल्यावर आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या दिवा येथेदेखील शिवसेनेविषयी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी दिवा शहरच्या वतीने दिव्यात एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील, नरेश पवार, विनोद भगत, जिल्हा चिटणीस विजय भोईर, सपना भगत, रोशन भगत, गणेश भगत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षीय ताकद पाहता तसेच या मतदारसंघातील आमदार आणि नगरसेवकांची संख्या बळ पाहता भाजपच्या खासदारसाठी पोषक असे वातावरण आहे. दिवा शहरातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांची व मतदारांची एक मताने एक मुखाने हीच मागणी आहे, की कल्याण लोकसभेसाठी उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा.

याविषयी दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना आम्ही विनंती केली आहे की, कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो, पण चिन्ह मात्र कमळच असो अशी आम्ही मागणी केली आहे. कारण या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे येथे भाजपचे तीन आमदार आहेत. त्यातील एक मंत्री आहे तसेच कल्याण ग्रामीण, डोंबिवली, दिवा मतदारसंघातदेखील भाजपची ताकद मोठी आहे.

मतदारांचा कौलदेखील भाजपच्या (Bjp) बाजूने आहे. अब की बार 400 पार हे जे ध्येय्य आहे ते कमळ चिन्हावरच शक्य होईल, बाकी कोणत्या चिन्हावर शक्य होणार नाही. यामुळे भाजप आता येथे आपला उमेदवार देतो की शिंदे (Ekanath shinde) यांना दिवा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते, हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Shrikant Shinde
Raju Patil Vs Shrikant Shinde: निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे; पाटलांचा शिंदेंना खोचक सल्ला

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com