Shrikant Shinde : कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंसाठी 'तो' प्रश्न ठरणार अडचणीचा?

Kalyan-Dombivli : श्रीकांत शिंदेंच्या 'वचननाम्या'त असलेल्या समांतर रस्त्याचे काय झाले ?
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: डोंबिवली-कल्याण भागात वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेता रस्ता रुंदीकरण करूनदेखील कल्याण शिळ रस्ता अपुरा ठरत आहे. या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढून दररोज वाहतूककोंडी होते. या रस्त्याला आणखी एक पर्याय म्हणून डोंबिवली मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याची नितांत गरज आहे.

माणकोली-मोठागाव खाडीपुलानंतर ठाण्याला जोडणाऱ्या समांतर रस्त्याचे नेमके काय झाले ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या निवडणुकीच्या 'वचननाम्या'मध्ये या रस्त्याचा उल्लेख करण्यात आला होता. सद्यःस्थितीत मनसे आमदार राजू पाटील स्वतः या विषयात लक्ष घालत आहेत. तरी खासदार शिंदे या विषयाकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न डोंबिवलीकर विचारत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrikant Shinde
BJP Politics : भाजपचं लक्ष्य, निवडणुकीआधी ठाकरेंचा बंदोबस्त

'वचननाम्या'मध्ये समांतर रस्त्याचा उल्लेख

1999 मध्ये साधारण या प्रकल्पाच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यांनतर या रस्त्यासाठी सर्व्हेदेखील करण्यात आला. मात्र काही पर्यावरणीय कारणास्तव या रस्त्याला मंजुरी मिळाली नाही. मात्र डोंबिवली शहर हे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे लोकसंख्या वाढली. परंतु सगळा भार रेल्वेवर येत असल्याने काहीतरी पर्याय शोधावा, या हेतूने हा रस्ता व्हावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली. इतकेच नव्हे, तर 2019 ला झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत 'वचननामा'मध्ये समांतर रस्त्याचा उल्लेख श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला होता.

आगामी निवडणुकीत खासदार शिंदे हा मुद्दा पुन्हा मांडणार का?

गेल्या दहा वर्षांत अनेक नवीन रस्ते झाले. मात्र अत्यंत महत्त्वाचा असणारा हा रस्ता दुर्लक्षित राहिला. भविष्यात कल्याण-शिळ रस्ता संपूर्णपणे सहापदरी झाला. तसेच मोठा गाव माणकोली हा नवीन रस्तादेखील सुरू झाला. तरी कल्याण-शिळ स्त्यावरील वाहतुकीचा ताण फारसा कमी होणार नाही. वाहतुकीच्या गर्दीचे विकेंद्रीकरण करायचे असेल तर डोंबिवली मुंब्रा हा रेल्वे समांतर रस्ता होणे काळाची गरज आहे.

यापूर्वी झालेल्या अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या 'वचननाम्या'मध्ये शिवसेना-भाजप युतीने रेल्वे समांतर रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना व निवडून आलेल्या आमदार-खासदारांना त्याचा विसर पडल्याचे समोर येत आहे. आता पुन्हा विसर पडलेला हा रस्ता खासदारांच्या 'वचननामा'मध्ये दिसून येणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रस्त्यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी अनेक वेळा आवाज उठवला, मात्र खासदार शिंदे या विषयाकडे नेमके कसे बघतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(Edited by: Ganesh Thombare)

R...

Shrikant Shinde
Thackeray Vs Narwekar : नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरेंची मोठी खेळी; मुंबईनंतर आता पुण्यात भरवणार 'जनता न्यायालय' ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com