Dombivli Crime : गुन्हेगारांवर 'दयावान सरकार' मेहेरबान?, डोंबिवलीत चाललंय तरी काय?

Hoarding Controversy : डोंबिवलीतील होर्डिंगवर गँगस्टरचा फोटो, खळबळ उडाल्यानंतर महापालिकेने तत्परतेने होर्डिंग उतरवले
Dombivli Hoarding
Dombivli HoardingSarkarnama
Published on
Updated on

Dombvili Political News :

डोंबिवलीतील एका होर्डिंगमुळे आज मोठी खळबळ उडाली. या होर्डिंगमुळे डोंबिवली खरेच सुसंस्कृत नगरी आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेला धोक्याची जाणीव झाली आणि दुपारी हे वादग्रस्त होर्डिंग उतरवण्यात आले.

महाराष्ट्र सरकारचा 'दयावान सरकार' असा उल्लेख असणाऱ्या या होर्डिंगवर सचिनभाई खुस्पे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. गंभीर बाब म्हणजे यावर गँगस्टर आश्विन नाईक याचा फोटो होता.

Dombivli Hoarding
Thane Police : आता सगळे 'बंदुकधारी' ठाणे पोलिसांच्या निशाण्यावर

कल्याण पूर्वेकडील भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार करून राजकारण कुठल्या थराला गेले, हे दाखवून दिले. शिवाय गेल्या आठवड्याच याच परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक मनोज रॉय यांच्यावर गंभीर आरोप करणारा गुन्हा दाखल झाला आहे. अशातच डोंबिवलीत गँगस्टरचे होर्डिंग झळकल्याने कल्याण-डोंबिवली गुन्हेगारीकडे (Crime) वळतोय का, याची चर्चा सुरू झाली आहे.

आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर कल्याण-डोंबिवलीतील (Kalyan Dombivli) राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणाला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. डोंबिवलीतील केडीएमसीत शेलार गँगची एकेकाळी दहशत होती. ही गँग कालातंराने संपुष्टात आली. कल्याण पूर्वेत गेल्या काही वर्षांत अनेक गँगवॉरच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोळीबाराच्या घटनेनंतर समर्थकांकडून त्यांचा नेता किती मोठा झाला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सगळे सुरू असताना डोंबिवलीत सचिनभाई खुस्पे याच्या वाढदिवसाचे होर्डिंग झळकले. त्यावर 'दयावान सरकार महाराष्ट्र सरकार' असा उल्लेख आणि 'दयावान सरकारचे आधारस्तंभ' म्हणून सचिनभाई खुस्पे याचे नाव होते. कहर म्हणजे होर्डिंगच्या उजव्या कोपऱ्यात गँगस्टर आश्विन नाईकचा फोटो आहे. (Hoarding Controversy)

सुसंस्कृत डोंबिवलीसाठी लाजीरवाणी बाब म्हणजे हे सर्व उघड उघड केले जात आहे. या होर्डिंगची शहरात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत हे वादग्रस्त होर्डिंग उतरवले. तरीही 'बुंद से गयी वो हौद से नही आयी', अशी चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Dombivli Hoarding
Ganpat Gaikwad Firing : वाद... भडका... गोळीबार... अटक...; जाणून घ्या जसाच्या तसा घटनाक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com