Kalyan-Dombivli Politics : तब्बल 28 दिवसानंतर 'ते' तीन नगरसेवक आले समोर! 'नाॅट रिचेबल' नाट्याला नवे वळण! विभागीय आयुक्तांकडे नोंदणी

KDMC Shivsena UBT : सुरुवातीला ठाकरे गटाचे केवळ सात नगरसेवक एकत्र आल्याने गट स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळाचा प्रश्न निर्माण झाला होता. महासभेत व्हीप बजावण्यासाठी आवश्यक संख्या नसल्याने पक्षाची कोंडी झाली होती.
Rahul Kot, Swapnali Kene and Madhur Mhatre during recent political developments in Kalyan-Dombivli Municipal Corporation.
Rahul Kot, Swapnali Kene and Madhur Mhatre during recent political developments in Kalyan-Dombivli Municipal Corporation.sarkarnama
Published on
Updated on

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर रंगलेले राजकीय नाट्य आता नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. तब्बल 28 दिवस संपर्काबाहेर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी शुक्रवारी कोकण भवन येथे हजर राहून सदस्य नोंदणी केली. मात्र ते ठाकरे गटासोबत राहणार की वेगळी भूमिका घेणार याविषयी संभ्रम अद्याप कायम आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र मोजणीनंतर राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि मधुर म्हात्रे हे तिघे संपर्काबाहेर राहिले होते. अखेर 28 दिवसांनंतर शुक्रवारी त्यांनी कोकण विभागीय आयुक्तालयात हजेरी लावत सदस्यत्वाची नोंदणी केली.

विशेष म्हणजे राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असून त्यांनी ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुरुवातीला ठाकरे गटाचे केवळ सात नगरसेवक एकत्र आल्याने गट स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळाचा प्रश्न निर्माण झाला होता. महासभेत व्हीप बजावण्यासाठी आवश्यक संख्या नसल्याने पक्षाची कोंडी झाली होती. नंतर किर्ती ढोणे या नगरसेविका पक्षाच्या संपर्कात आल्याने संख्या आठवर पोहोचली आणि गट स्थापन होऊ शकला. मात्र उर्वरित तीन नगरसेवकांनी अद्याप आपली स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

या घडामोडींवर गटनेते उमेश बोरगावकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, संबंधित तिघांनी नोंदणी केली असली तरी त्यांना गटात सामील करून घेतलेले नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना गटात घेतले नाही की नगरसेवकच पक्षात जाण्यास इच्छुक नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ फेब्रुवारी ही नोंदणीची अंतिम तारीख असल्याने त्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

Rahul Kot, Swapnali Kene and Madhur Mhatre during recent political developments in Kalyan-Dombivli Municipal Corporation.
NCP Merger : "पवार साहेबांनी थांबायचं अन् अजितदादांनी नेतृत्व करायचं", हे तर..." राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर 'मुश्रीफांचा' थेट मुद्द्यालाच हात

राजकीय पेच निर्माण

मशाल चिन्हावर निवडून येऊनही पक्ष प्रक्रियेपासून दूर राहिल्याबद्दल या तिघांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील कारवाई काय होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या नगरसेवकांच्या भूमिकेमुळे केडीएमसीतील ठाकरे गटाची ताकद वाढणार की राजकीय पेच कायम राहणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Rahul Kot, Swapnali Kene and Madhur Mhatre during recent political developments in Kalyan-Dombivli Municipal Corporation.
Kolhapur Politics : महादेवराव महाडिकांचा स्कोअर सेटल! आता पुन्हा विश्वास पाटलांची बारी; व्हायरल कॉल रेकॉर्डिंगनंतर 'गोकुळमध्ये' काटा काढणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com