Vanchit : 'वंचित'ची नेमकी साथ कुणाला? कार्यक्रम नसल्याने कार्यकर्ते सैरभैर

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबवलीत नवीन कार्यकारिणी सदस्य काम करत नसल्याने नाराजी
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan AghadiSarkarnama

Vanchit Bahujan Aghadi : गेल्या पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीकडून डोंबिवलीत अनेक आंदोलन करण्यात आली. मात्र नऊ महिन्यांपूर्वी कार्यकारणी बदलल्यानंतर पक्षात शांतता पसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीशी हातमिळवणी करणाऱ्या वंचितचा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्य निवडणुकीत आघाडीला किती फायदा होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नव्या कार्यकारिणीवर कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच पक्षाने नेमकी कुणाला साथ देणार, याबाबतही ठोस भूमिका घेतली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत.

वर्षभरापूर्वी आंदोलनांचा सपाटा

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit) याआधी डोंबिवली शहरात विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती. यावेळी सुतिकागृहाचा विषय असो, स्मशानभूमीचा विषय किंवा शौचालयाचा विषय असो अशा अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घालत त्यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाविरोधात आंदोलन छेडली होती. यामध्ये डोंबिवलीत वंचित बाहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते सक्रिय होते. त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी बदलण्यात आली.

Vanchit Bahujan Aghadi
Narayan Rane : आघाडीत 'एक ना धड भाराभर चिंध्या'; नारायण राणेंचा काँग्रेसवर घणाघात

कार्यकर्त्यांत नाराजी

पक्षाने गेल्या नऊ महिन्यांपासून जिल्हा कार्यकारिणी बदलली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यक्रम ठप्प पडले आहेत. गेल्या आठवड्यात डोंबिवलीत (Dombivli) आलेल्या संभाजी भिडे यांना पळवून लावण्यासाठी रीपबलिकन पक्षाच्या साथीने वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी समोर आले. मात्र त्याआधी आणि त्यानंतरही कार्यकारिणी बदलली असल्याची माहितीही अनेक कार्यकर्त्यांना नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लवकरच सक्रिय होणार

याबाबत डोंबिवली पूर्वचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष चंद्रकांत पगारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आता राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने आम्ही थांबलो आहोत. त्यांनतर ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन छेडणार आहे. सध्या आंदोलने किंवा कार्यक्रम काही कारणास्तव बंद होते. आता पुन्हा सक्रिय होणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपण नेमकी कोणाला साथ द्यायची, हा प्रश्न सतावत आहे. याबाबत वरीष्ठांकडून कोणतीही सूचना आली नसल्याने संभ्रम असल्याचेही काही कार्यकर्त्यांनी खंत बोलून दाखवली.

(Edited by Sunil Dhumal)

Vanchit Bahujan Aghadi
Congress Politics : आघाडीत ठिणगी! पूर्व विदर्भातील सर्व जागांवर काँग्रेसचा दावा; घटक पक्षांची भूमिका काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com