Kalyan Loksabha Election: खासदार शिंदेंच्या विरोधात सुभाष भोईरांनी थोपटले दंड; कल्याणमध्ये वाढदिवसाचे...

Mumbai Politics: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे.
Kalyan Loksabha Election:
Kalyan Loksabha Election:Sarkarnama
Published on
Updated on

Subhash Bhoir Banners at kalyan: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून विधानसभेसह लोकसभा निवडणुकांसाठी वेगवेगळ्या मतदार संघांमध्ये चाचपणीही सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या कल्याण मतदार संघाकडे तर ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Subhash Bhoir's challenge to MP Shrikant Shinde)

ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांचे अंबरनाथ शहरात वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावण्यात आले असून त्यावर भोईर यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनर्समुळे सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Kalyan Loksabha Election:
BJP on Brijbhushan Singh: कुस्तीपटूंच्या आंदोलन प्रकरणी भाजप हायकमांड अॅक्शन मोडवर; ब्रिजभूषण सिंहांना दिले महत्त्वाचे निर्देश

कोण आहेत सुभाष भोईर ?

२०१४ साली सुभाष भोईर कल्याण ग्रामीण विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. पण २०१९ ला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच तिकीट कापत केडीएमसीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना संधी दिली. पण त्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांचा पराभव झाला आणि मनसेचे राजू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच तिकीट कापल्यामुळे सुभाष भोईर हे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज होते. त्यानंतर गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतरही सुभाष भोईर यांनी ठाकरे गटातचं राहणं पसंत केलं. ठाकरे गटाने त्यांना कल्याण लोकसभेचं संपर्कप्रमुखपद दिलं.

Kalyan Loksabha Election:
Joe Biden News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भर कार्यक्रमात पाय अडखळून पडले; नेमकं काय घडलं?

सुभाष भोईर यांनी या बॅनर्सच्या माध्यमातून थेट श्रीकांत शिंदे यांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपातही ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन जागा ठाकरे गटाला सोडल्या जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. जाण्याची शक्यता आहे. जर या जागा ठाकरे गटाला मिळाल्या तर आपल्याला कल्याणमध्ये लोकसभेचं तिकीट मिळावं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा घेता यावा. असं तर सुभाष भोईर यांच्या मनात नाही ना, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com