BJP on Brijbhushan Singh: कुस्तीपटूंच्या आंदोलन प्रकरणी भाजप हायकमांड अॅक्शन मोडवर; ब्रिजभूषण सिंहांना दिले महत्त्वाचे निर्देश

Delhi Politics: राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलन दिवसेंदिवसं अधिक तीव्र होत चालले आहे.
FIR Against Brijbhushan Sharan Singh :
FIR Against Brijbhushan Sharan Singh : Sarkarnama
Published on
Updated on

Wrestlers Protest News: राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलन दिवसेंदिवसं अधिक तीव्र होत चालले आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इतके दिवस याप्रकरणी शांत असलेली भाजप आता भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या विरोधात अॅक्शन मोडवर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप (BJP) हायकमांडने ब्रिजभूषण विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्रीय नेतृत्वाने ब्रिजभूषण यांना कुस्तीपटूंच्या बाबतीत अनावश्यक वक्तव्ये टाळण्याची सूचना केली आहे. यासोबतच, हायकमांडच्या आदेशाने ब्रिजभूषण यांनी 5 जून रोजी होणारी प्रस्तावित सभा रद्द केली आहे.

FIR Against Brijbhushan Sharan Singh :
Ahmednagar Politics : ''...तर आनंद द्विगुणित झाला असता!''; नगरच्या नामांतरानंतर आमदार जगतापांनी छेडला विभाजनाचा मुद्दा

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ५ जून रोजी अयोध्येत जनजागृती रॅली काढणार होते. या रॅलीमध्ये 11 लाख लोक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार दावा त्यांनी केला होता. पण आज (२ जून) फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही रॅली रद्द करत असल्याची घोषणा केली. (Wrestlers Protest)

विरोधी पक्षांवर आरोप

ब्रिजभूषण यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, ''माझ्या प्रिय शुभचिंतकांनो! तुमच्या पाठिंब्याने मी गेली २८ वर्षे लोकसभेचा सदस्य म्हणून काम केले आहे. मी सत्तेत असताना आणि विरोधात असताना सर्व जाती, समाज आणि धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. याच कारणांमुळे माझे राजकीय विरोधक आणि त्यांच्या पक्षांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. (

FIR Against Brijbhushan Sharan Singh :
Shivrajyabhishek : रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय, सरकारवर तुटून पडले अमोल मिटकरी...

सध्याच्या परिस्थितीत काही राजकीय पक्ष ठिकठिकाणी मोर्चे काढून प्रांतवाद, प्रादेशिकवाद आणि जातीय संघर्ष वाढवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी संपूर्ण समाजात पसरलेल्या तिरस्काराच्या भावनांवर विचारमंथन करण्यासाठी ५ जून रोजी अयोध्येत संत संमेलन घेण्याचे ठरले होते. पण पोलीस माझ्यावरील आरोपांची चौकशी करत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करत ५ जूनला होणारी ‘जन चेतना’ महारॅली आणि 'अयोध्या चलो' कार्यक्रम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे ब्रिजभूषण यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com