Kalyan Marathi Youth Assault: मराठी तरुणावर परप्रांतीयांचा हल्ला ; उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला 'हा' आदेश

Kalyan Marathi Family Attack case : हल्लेखोर परप्रांतीयावर कठोर कारवाई करा, त्याच्या साथीदार गुंडांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करा, अशी मागणी धीरज देशमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे.
Bombay High Court On Badalapur Rape Case
Bombay High Court On Badalapur Rape CaseSarkarnama
Published on
Updated on

kalyan News:अमराठी कुटुंबाने बाहेरुन माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नुकतीच कल्याणमध्ये घडली होती. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. धीरज देशमुख यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु असून मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.

हल्लेखोर परप्रांतीयावर कठोर कारवाई करा, त्याच्या साथीदार गुंडांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करा, अशी मागणी धीरज देशमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे. याबाबत देशमुख यांनी धाव घेतली आहे. या मारहाणीत विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत.

Bombay High Court On Badalapur Rape Case
Delhi Election: दिल्लीत AI ठरतेय EC ची डोकेदुखी! निवडणूक आयोगाकडून सूचना

विजय कल्वीकट्टे यांच्यावर मुंबई येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. या प्रकरणी तातडीने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत. पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.

कल्याणमधील अमजेरा हाईट्स सोसायटीत ही घटना घडली होती. धूप लावण्याच्या वादातून परप्रांतीयाने गुंडांनी मराठी तरुणांवर हल्ला केला होता. या घटनेचे दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

Bombay High Court On Badalapur Rape Case
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख मर्डर A टू Z स्टोरी; असा ठरला हत्येचा प्लॅन

अमजेरा हाईट्स सोसायटीत काय घडलं होतं...

  • 18 डिसेंबर रोजी रात्री धूप जाळण्याच्या कारणावरून तुफान राडा झाला होता.

  • अखिलेश शुक्ला या परप्रांतीयाने बाहेरून गुंड बोलावून देशमुख कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती.

  • सीसीटीव्हीमध्ये या मारहाणीची घटना कैद झाली आहे.

  • अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी गीता आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करत अटक केली होती.

  • देशमुख कुटुंबियांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केला आहे.

  • पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com