Raj Thackeray : तीन महापुरुषांचे फोटो शेअर करीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे टोचले कान!

Dr BR Ambedkar Mahaparinirwan Din 2023 : महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल.
Dr BR Ambedkar Mahaparinirwan Din 2023 Raj Thackeray
Dr BR Ambedkar Mahaparinirwan Din 2023 Raj ThackeraySarkarnama

Mumbai News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (बुधवार) राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दादर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकत्र असलेला हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आपल्या पोस्टमधून राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत राज्यकर्त्यांचे कान टोचले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना आताच्या राज्यकर्त्यांकडून त्याचे कसे पालन होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Dr BR Ambedkar Mahaparinirwan Din 2023 Raj Thackeray
Narendra Singh Kushwaha: भाजपच्या नेत्यासाठी तीन अंक ठरला लकी ; तिसऱ्यांदा झाले आमदार..

"उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल," असा इशारा राज यांनी दिला आहे.

"कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. ह्याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे," अशा शब्दात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर राजकर्त्यांना आरशा दाखवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com