Uddhav Thackeray, Manisha Kayande
Uddhav Thackeray, Manisha KayandeSarkarnama

Manisha Kayande News: कायंदेंच्या पक्षांतराने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद सोडावे लागणार?

Legislative Council Opposition Leader : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्या प्रत्येकी नऊ
Published on

Shivsena (UBT) And NCP : शिवसेनेच्या (ठाकरे गट) विधानपरिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाने तत्पुरीच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली. दरम्यान, कायंदे यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाची आता चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. विधानपरिषदेत ठाकरे गटाकडे असलेले विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी दावा केला आहे. (Latest Marathi News)

विधानपरिषदेत भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे ११ सदस्य होते. महाविकास आघाडतीतून जास्त सदस्य असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद दिले. पक्षाने अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वप्रथम ठाकरे समर्थक सदस्य विप्लब बाजोरिया यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनीषा कायंदे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे ठाकरे गटाला विधानपरिषदेत फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Uddhav Thackeray, Manisha Kayande
Uddhav Thackeray News : फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाची आज बैठक; 'या' मुद्द्यांवर चर्चा होणार

मनीषा कायंदे यांच्या प्रवेशानंतर सध्या विधानपरिषदेतील शिंदेंच्या शिवसेनेची सदस्यसंख्या दोन झाली आहे. विधानपरिषदेतील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाची ९, राष्ट्रवादी काँग्रेसचेही ९, तर काँग्रेसची सदस्य संख्या ८ आहे. कायंदे यांच्या पक्षांतरानंतर आणखी काही सदस्य शिंदे गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे सदस्य संख्या कमी होताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा दावा सांगितला जात आहे.

Uddhav Thackeray, Manisha Kayande
NCP Opposition Leader : विधानपरिषदेत ठाकरे गट-राष्ट्रवादीची संख्याबळ सम-समान; विरोधीपक्ष नेतेपदावर मिटकरींचा दावा?

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत विचार करू असे म्हटले आहे. तर अमोल मिटकरी यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे हे पद देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आज मंगळवारी (ता. २०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत माजी विधानपरिषदेचे माजी सचिव अनंद कळसे म्हणाले, "कायंदे यांच्या पक्षांतराने विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील संख्याबळ सारखेच ९ झाले आहे. आता महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी याबाबत काय निर्णय घेतील, यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे आता तरी काय होईल हे सांगता येत नाही."

(Edited By Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com