Uddhav Thackeray Guide Former Corporator : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची आज मंगळवारी (ता. २०) बैठकीचे आयोजन केले आहे. शिवसेना भवन येथे दुपारी बारा वाजता होणाऱ्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. ते या बैठकीत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहेत. (Latest Marathi News)
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटातील अनेक खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही अनपेक्षितपणे शिंदे गटाची वाट धरली. आगामी काळात महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त होत आहे.
निवडणुका जवळ येतील, तसे अनेकजण ठाकरे गटाची साथ सोडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. या निवडणुका आणि पक्ष सोडण्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे माजी नगरसेवकांना सूचना करण्याची शक्यता आहे. दरम्यान काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षातून होणारी गळती रोखण्यासाठी ठाकरे कोणता सल्ला देणार, याकडे आता लक्ष लागले आहे. आगामी पालिकेच्या निवडणुकीची काय रणनीती असणार, यावर ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोविड घोटाळ्याबाबत ठाकरेंना इशारा दिला आहे. त्या दृष्टीनेही या बैठकीकडे पाहिले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तिजोरीत गेलेला प्रत्येक पैसे आमचे सरकार परत आणणार असल्याचा इशाराही फडणवीस यांनी सोमवारी (ता. १९) ठाकरेंना दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीत या कथीत घोटाळ्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.