Khopoli Election : ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेत मतदानाआधीच्या सेटलमेंटची चर्चा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा देणारा डाव?

Khopoli Politics : खोपोली निवडणुकीत ठाकरे - शिंदे शिवसेना सेटलमेंटच्या चर्चेमुळे मतदानानंतरचे समीकरण उलथण्याची शक्यता वाढली असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Voters in Khopoli turnout in large numbers as speculation rises about a Thackeray–Shinde Sena settlement and possible political shift affecting NCP’s stronghold.
Voters in Khopoli turnout in large numbers as speculation rises about a Thackeray–Shinde Sena settlement and possible political shift affecting NCP’s stronghold.Sarkarnama
Published on
Updated on

Khopoli News : चार वर्षे रखडलेल्या निवडणुका, सलग प्रशासकीय कारभाराचा कंटाळा आणि स्थानिक नागरी समस्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर खोपोलीकरांनी उत्साहाने मतदान करून सत्तेच्या पुनर्स्थापनेची जोरदार चाहूल दिली आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शहरात तब्बल 68.72 टक्के मतदान नोंदले गेले असून, विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेत ऐतिहासिक सहभाग नोंदवला आहे.

यंदाच्या निवडणुकीत 20,864 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 21,674 पुरुषांनी मतदान केले आहे. एका तृतीयपंथी मतदारानेही मतदान करून लोकशाही प्रक्रियेला योगदान दिले. 'लाडक्या बहिणींनी ' ओवाळणी कोणाला करायची, या प्रश्नाचे उत्तर 21 डिसेंबरला मिळणार असून, खोपोली शहरात त्याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

खोपोलीतील नगराध्यक्षपदाची लढत मुख्यतः परिवर्तन आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगली आहे. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला असला तरी आघाडीत अखेरच्या क्षणी झालेल्या बिघाडीने समीकरणे बदलली आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी परिवर्तन आघाडी स्थापन केली होती. पण काही दिवसांतच शेकाप आणि राष्ट्रवादीवर टीका करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परिवर्तन आघाडीतून बाहेर पडला.

Voters in Khopoli turnout in large numbers as speculation rises about a Thackeray–Shinde Sena settlement and possible political shift affecting NCP’s stronghold.
Pratap Sarnaik-Video : प्रताप सरनाईकांनी आपला शब्द खरा केला; पनवेल-खोपोली एसटीने प्रवास केला!

आता त्यांचा रुसवा आणि त्यांची साधारण 8,500 मतांची ताकद कोणाच्या बाजूला वळली, या प्रश्नावरच नगराध्यक्षपदाची वाटचाल अवलंबून राहणार आहे. ही मते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराच्या बाजूने वळली असल्यास संपूर्ण राजकीय चित्र पालटू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खोपोली नगर परिषदेवर 15 वर्षांहून अधिक काळ निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.

Voters in Khopoli turnout in large numbers as speculation rises about a Thackeray–Shinde Sena settlement and possible political shift affecting NCP’s stronghold.
साम, दाम, दंड, भेदाने शिवसेनेला धडा शिकवू : नीलेश राणे

खोपोली शहर कायम राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मागील थेट नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुमन औसरमल यांनी 700 मतांनी विजय मिळवला होता. या वेळी मात्र महायुतीचे कुलदीपक शेंडे आणि परिवर्तन आघाडीचे सुनील पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. सुज्ञ खोपोलीकरांनी कोणावर विश्वास ठेवला हे निकालच सांगतील. रायगडमधील रोहा व महाड येथे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असला, तरी खोपोलीत मात्र अत्यंत शांततेत मतदान पार पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com