पोलिसांनी कारवाईची पावलं उचलताच सोमय्या पिता-पुत्र नॉट रिचेबल

Sanjay raut| Kirit somaiya| Niil Somaiya| शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेव्ह विक्रांत घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते
Kirit somaiya| Niil Somaiya|
Kirit somaiya| Niil Somaiya|
Published on
Updated on

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांना मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police Station) समन्स बजावले होते. तसेच, आज 11 वाजता त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. समन्स बजावले त्यावेळी किरीट सोमय्या घरात नव्हते. त्यानंतर आता दोन्ही पिता पुत्र नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

तीन-चार दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सेव्ह विक्रांत प्रकरणी गंभीर आरोप केले होते. भारतीय नौदलाची (Indian Navy) विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' भंगारात न जाता तिचे संग्रहालय व्हावे यासाठी २०१३ मध्ये किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले. मात्र, हा निधी राज्यपाल कार्यालयात जमाच झाला नाही, सोमय्यांनी तो त्यांच्या व्यवसायासाठी वापरला, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याच प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स बजावले आहेत.

Kirit somaiya| Niil Somaiya|
आयएनएस विक्रांतचा निधी कुठे गेला ? दोन दिवसांनी सोमय्यांनी दिलं राऊतांना उत्तर

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. माजी सैनिक बबन भोसले (Former soldier Baban Bhosle) यांनी शुक्रवारी (८ एप्रिल) रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. तसेच, गुरुवारी संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमय्या पिता पुत्राविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी केलेले आरोप किरीट सोमय्यांनी खोडून काढले आहेत.माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, पण त्याबाबतचे पुरावे द्यावे, असे सोमय्यांनी माध्यमांना सांगितले आहे. ''आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता.'' तर ''निधी जमा करा, मग मी पुरावे देतो,'' असे राऊतांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com