Navi Mumbai Uran Girl Murder : उरण हत्याकांडावर सोमय्या, वाघ, राणेंचा संताप; 'लव्ह आणि व्होट जिहाद'ची आक्रमता वाढली

BJP Aggressive on Murder Case of Uran Girl : नवी मुंबईच्या उरण हत्याकांडावर भाजप नेते किरीट सोमय्या, चित्रा वाघा आणि आमदार नीतेश राणे यांनी संताप व्यक्त केला. राज्यात लव्ह आणि व्होट जिहादची आक्रमता वाढत असल्याचा किरीट सोमय्या यांनी म्हटले.
Navi Mumbai Uran Girl Murder
Navi Mumbai Uran Girl MurderSarkarnama
Published on
Updated on

Uran Girl Murder News : नवी मुंबईतील उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय युवतीच्या हत्येवरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ, किरीट सोमय्या यांनी उरणमध्ये पीडित मुलीच्या घरी जाऊन भेट दिली.

ही हत्या लव्ह जिहादमधूनच झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या घटनेवरून लव्ह जिहाद, लेन जिहाद आणि व्होट जिहादची आक्रमता वाढल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ही घटना वेदनादायी असल्याचे सांगितले. यशश्री शिंदे या युवतीच्या हत्या कशी झाली, याचा तांत्रिक मुद्यांच्या आधारे उलगडा केला आहे. घटनेतील आरोपी कसा पळून गेला हे देखील माहीत आहे. आरोपीशी निगडीत असलेल्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्यातील आरोपी स्थानिक नसून तो कर्नाटकचा आहे. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत.

गुन्ह्यातील आरोपाला फाशीची शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. नुसते मोर्चा काढून होणार आहे. आपल्या मुलींना वाचवण्यासाठी पुढाकार आपणच घेतला पाहिजे.

मुलींना समजावा, त्यांच्याशी बोला, आई-बहीण-बाप होऊन तिच्याशी संवाद साधा. पोलिस त्यांचे काम करणार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

Navi Mumbai Uran Girl Murder
Congress : बहिणींना पैसे नको, रक्षा हवी! काँग्रेसनं शिंदे, फडणवीसांवर निशाणा साधला

माजी खासदार नेते किरीट सोमय्या यांनी हा प्रकार लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप केला. राज्यात वेगाने लव्ह जिहाद, लेन जिहाद आणि व्होट जिहादची आक्रमता वाढत असल्याचे सांगितले. आमदार नीतेश राणे यांनी राज्यात लव्ह जिहाद असल्याचा हा पुरावा आहे.

उरणमधील माझ्या बहिणीने धर्मांतर केले नाही म्हणून ही अवस्थता केली. त्या जिहाद्याला जी काही शिक्षा द्यायची आहे, त्यासाठी आमचे हिंदुत्ववादी सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोठेही कमी पडणार नाही, असा ठाम विश्वास आहे. हिंदू समाज हा बदला निश्चितपणे घेईल, हे जिहाद्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा नीतेश राणे यांनी दिला.

Navi Mumbai Uran Girl Murder
Milind More: धक्कादायक: टोळक्याच्या हल्ल्यात ठाणे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा मृत्यू

पीडितेच्या वडिलांचा दाऊदवर हल्ला

उरणमधील यशश्री शिंदे या युवतीची हत्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे. पीडितेचे दाऊद शेख हिच्याशी प्रेमसंबंध होते. पीडितेच्या वडिलांनी या दाऊद शेखवर 2019 मध्ये हल्ला देखील केला असल्याचे समजते. याला पोलिसांकडून दुजोरा मिळतोय. यशश्री शिंदे हिला दाऊद शेख गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होता.

दाऊद शेखवर पोस्कोचा गुन्हा

हे दोघे 2019 मध्ये एका कंपनीत कामाला होते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री होती. यातूनच पीडितेच्या वडिलांनी दाऊद शेख याच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी पीडिता अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दाऊद शेखविरोधात पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता. दाऊद शेख याला या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो कर्नाटक इथं गेला. त्यानंतर देखील दाऊद आणि यशश्री संपर्कात होते, असे पोलिस तपासात समोर आलं आहे.

पोलिसांना शंका

पीडितेच्या वडिलांनी सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा राग दाऊद शेख याच्यात मनात होता. त्यातूनच दाऊद शेख याने ही हत्या केली असावी, असा संशय मुंबई पोलिसांना आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com