Kirit Somaiya Viral Video : दानवे सोमय्यांना इंगा दाखवणार; कथित व्हिडिओचे पुरावे विधान परिषदेत मांडणार

Ambadas Danve On Kirit Somaiya Viral Video: "मागील दोन महिन्यांपासून काही महिलांनी आमच्याकडे आमच्या महिला नेत्यांशी यासंदर्भात संपर्क केला'
Kirit Somaiya Viral Video
Kirit Somaiya Viral VideoSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवरून सोमय्यांची कोंडी करण्याची खेळी विरोधक करीत आहेत. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटत आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सोमय्यांच्या व्हिडिओ प्रकरणातील पुराेव विधान परिषदेत सादर करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत काही महिलांनी संपर्क केल्याचा वादाही दानवे यांनी केला आहे. परिणामी हे प्रकरण हे प्रकरण सोमय्यांना चांगलेच भोवणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

दानवे म्हणाले, "भाजपचे नेते सोमय्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. भाजप पक्ष साधनसुचिता, संस्कृती रक्षणाच्या गप्पा मारत असते. यापूर्वीच मागील दोन महिन्यांपासून काही महिलांनी आमच्याकडे आमच्या महिला नेत्यांशी यासंदर्भात संपर्क केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांबाबतचे वेगवेगळे विषय समोर येणार आहेत. सोमय्या यांनी गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली असेल तर चांगलं आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ चौकशी करावी."

काय म्हटलं आहे किरीट सोमय्यांनी या पत्रात?

"सोमवारी सायंकाळपासून (ता.१७) एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे . मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत.

Kirit Somaiya Viral Video
NCP Crisis Update : राष्ट्रवादीत दक्षिण-उत्तरायण: शरद पवार बेंगळूरूत; तर अजित पवार दिल्लीला

तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.