Kirit Somaiya News: किरीट सोमय्यांचं 'कमबॅक', ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; उद्या करणार नवा धमाका

Kirit Somaiya Vs Uddhav Thackeray: कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या व्यवहाराची कसून चौकशी सुरू
Kirit Somaiya | Uddhav Thackeray
Kirit Somaiya | Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai Political News: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या व्हायरल व्हिडिओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. अधिवेशनातील गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा 'अॅक्टिव्ह मोड'वर आले आहेत.

भाजपचे नेते किरीट सोमय्या मंगळवारी आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचं ट्विट केलं आहे. त्यामुळे उद्या ते कुठला कथित घोटाळा बाहेर काढतात याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Kirit Somaiya | Uddhav Thackeray
Nitesh Rane On Thackeray: "राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा 'औरंग्या' कोण होता?"; नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या व्यवहाराची कसून चौकशी सुरू असताना त्यात कोरोना काळात खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आला आणि त्यामुळेच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी ट्विट करत केल्यामुळे मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Kirit Somaiya | Uddhav Thackeray
Palghar Politics News : पालघरमध्ये आदिवासी संघटनांचा 'एल्गार' तर मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री 'जव्हार'मध्ये !

सोमय्या ट्विटमध्ये काय म्हणाले..?

" उद्या मी उद्धव ठाकरे सेनेचा आणखी एक बीएमसी कोविड सेंटर घोटाळा (BMC Covid Scam) उघड करेन" असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. यामुळे हा घोटाळा नेमका काय असणार, यात ठाकरे गटाचा कुठला नेता अडचणीत येणार याविषयीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल...

मुंबई महापालिकेने कोरोना काळात दिलेल्या कंत्राटाची मुंबई पोलीस आणि सक्तवसुली संचालनालयाकडून कसून चौकशी सुरू असताना कथित बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kirit Somaiya | Uddhav Thackeray
Shailaja Darade Arrested News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेंना अटक

याशिवाय मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या दोघांवरील गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महापालिके(BMC)च्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची एसआयटीकडून चौकशी होत असताना मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार आहे.

कॅगकडून चौकशी झाल्यानंतर अहवाल समोर आला. त्यातच ईडीने छापेमारी केली. राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील कंत्राटाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. ईडीने कोविड हॉस्पिटल घोटाळा प्रकरणात काहींना अटकही केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com