Dapoli Sai Resort: साई रिसॉर्ट प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या दोन पावलं मागे : परबांना मोठा दिलासा

Kirit Somaiya on Sai Resort: साई रिसॉर्ट प्रकरणात मोठा ट्विस्ट
Kirit Somaiya on Sai Resort:
Kirit Somaiya on Sai Resort:Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri : दापोलीतील साई रिसॉट प्रकरण गेल्या दोन ते तीन वर्षापासून चांगलेच चर्चेत आहे. साई रिसॉट प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) अनेकवेळा आमने-सामनेही आले. या प्रकरणावरून किरीट सोमय्यांनी हातोडा यात्राही काढली होती. आता याच प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणात दाखल केलेली याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याविरोधात राष्ट्रीय हरित लवाद अर्थात 'एनजीटी'मध्ये दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

Kirit Somaiya on Sai Resort:
New Parliament:...म्हणून नवीन संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते केलं नसावं; वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप

साई रिसॉर्ट हे समुद्र किनारपट्टीच्या नियमन क्षेत्र अधिनियमांचे उल्लंघन करत बांधल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंतही पोहचलेलं आहे. मध्यंतरी साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीचीही एन्ट्री झाली होती.

किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणाची राष्ट्रीय हरित लवादात तक्रारही दाखल केली होती. मात्र, साई रिसॉर्ट प्रकरणाचा दावा मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सोमय्या यांनी ही याचिका आता मागे घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Kirit Somaiya on Sai Resort:
MP Balu Dhanorkar Health news : वडिलांचे निधन; खासदार बाळू धानोरकरांचीही प्रकृती बिघडली; तातडीने दिल्लीला...

दरम्यान, दापोलीतील उभारण्यात आलेले 'साई रिसॉर्ट'मध्ये सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झालं असून मनी लाँड्रिंगही झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणावरून अनिल परबांना अनेकवेळा लक्ष्य केलं होतं. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. आता साई रिसॉर्ट प्रकरणाबद्दलची राष्ट्रीय हरित लवादात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात आली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com