Kisan Sabha Long March : किसान मोर्चात नवा ट्विस्ट : बैठक रद्द, सरकारनेच आमच्याकडे यावं ; नेत्यांची आक्रमक भूमिका!

J P Gavit : शेतकऱ्यांची भावना सरकारला कळत नाही..
Kisan Sabha Long March :
Kisan Sabha Long March :Sarkarnama

Nashik News : किसान सभेच्या मोर्चात आता वेगळा ट्वि्स्ट आला आहे. किसान मोर्चा शिष्टमंडळ मुंबईत रवाना होणार नाही तर मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांनी आमच्याकडे यावे, अशी ठाम भूमिका मोर्चाने घेतली आहे. मोर्चाचे नेते जे पी गावीत ( J P Gavit) यांनी म्हंटले आहे की, "सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही आता चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस ही सरकारला झुकवू शकतो, हे आम्ही दाखवून देणार आहोत."

Kisan Sabha Long March :
Budget : एकनाथ खडसेंनी सांगितलं भूषण देसाईंचे शिंदे गटात जाण्याचे कारण, केला 'हा' गंभीर आरोप !

शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, आंदोलक शेतकऱ्यांची उद्विग्नता :

किसान मोर्चा शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडणार होती. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक काल सरकारनकडून रद्द करण्यात आली. आज आंदोलकांनीच या बैठकीत सामील होण्यास नकार दर्शवला.

मोर्चा मुंबईत जाणार आहेच, मात्र आता चर्चेसाठी मंत्र्यांनीच आमच्याकडे यावे, असे गावित यांनी भूमिका घेतली आहे. संप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने तातडीने प्राधान्य दिले, मात्र शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळत नाही, शेतकऱ्यांच्या पाहायला सरकारला वेळ नाही, म्हणत आंदोलकांनी रोष व्यक्त केला.

Kisan Sabha Long March :
Sanjay Raut News : राज्यात 'मुका घ्या मुका' कार्यक्रम सुरू ; राऊतांची खोचक टिपण्णी!

लाल वादळाची मुंबईच्या दिशेने आगेकूच :

शेतकऱी मोर्चा लालभडक वादळ आता नाशिक तालुक्याची सीमा ओलांडून मुंबईकडे कूच करत आहे. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातून हा मोर्चा रवाना झाला होता. आता हा मोर्चा इगतपुरीत येऊन धडकला. मोर्चेकरांनी हातात लाल बावटा घेऊन कूच कल्यामुळे रस्ते लालभडक झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com