Kishori Pednekar : 'एसआरए' घोटाळाच्या आरोपानंतर पेडणेकरांची आज चौकशी झाली, उद्याही होणार!

Kishori Pednekar : तीन आरोपींनी ३५ लाख रूपये लोकांकडून उकळले आहेत!
Kishori Pedanekar|
Kishori Pedanekar|Sarkarnama

मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि भाजप मध्ये आता नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते व माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेल्या आरोपमळे आता पेडणेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. एसआरए (SRA) सदनिका घोटाळा प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकरांची चौकशी केली.

Kishori Pedanekar|
Prakash Ambedkar : 'मोदी ठरवतात कुठला प्रकल्प कुठे न्यायचा, उरलेल्या राज्यांनी मुजरा घालायचा!'

एसआरए सदनिका घोटाळा प्रकरणाच्या आरोरपींशी पेडणेकर यांचे व्हॉट्स अॅप चॅट झाल्याचे माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या व्हॉट्स अॅप चॅटमुळे आता किशोरी पेडणेकर अडचणीत आलेत. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर दादर पोलिसांनी पेडणेकरांची चौकशी करण्यात आली आहे.

एसआरए सदनिका प्रकरणात पेडणेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. पेडणेकरांना आता पुन्हा एकदा उद्या चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. जून महिन्यात एसआरए सदनिका घोटाळाप्रकरणात पेडणेकारांवर गुन्हा दाखल आहे.

Kishori Pedanekar|
Tata-Airbus project : फाईल कशा फिरल्या, योग्य वेळी पुरावे देऊ ; भाजपचा देसाईंना इशारा

या प्रकरणी तीन आरोपींना दादर पोलिसांनी अटक केली आहे. पालिका कर्मचाऱ्याचा सुद्धा यात समावेश आहे. हे तीन्ही आरोपी आता पोलिस कोठडीमध्ये आहेत. काही गाळे परस्पर लांबवले, असा आरोप त्यांच्यावर आहे. एसआरएचे रूम सवलतीत मिळवून देतो, असं आमिष दाखवून लोकांकडून पैसे लाटणाऱ्या तिघाजणांना अटक केली आहे.

यामध्ये संजय लोखंडे या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. लोखंडे सोबत पेडणेकरांचे व्हॉट्स अॅप चॅट आढळून आल्याची माहिती आहे. या तीन आरोपींनी ३५ लाख रूपये लोकांकडून उकळले आहेत, म्हणून पेडणेकरांची चौकशी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com