Mumbai Politics : सर्वपक्षीयांना कोकण पदवीधर निवडणुकीचे वेध; वसई विरारची भूमिका निर्णायक

Kokan Politics : कोकण पदवीधर निवडणुकीचे वेध लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
Mumbai Politics : सर्वपक्षीयांना कोकण पदवीधर निवडणुकीचे वेध; वसई विरारची भूमिका निर्णायक
Published on
Updated on

Virar Political News : कोकण पदवीधर निवडणुकीचे वेध लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कोकण पदवीधऱ मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याकरता वसईतील जवळपास सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वसईची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने या वेळी निवडणुकीत चुरस पाहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार उतरविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या वेळी निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असून, आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदवता येणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर काँग्रेस, उद्धव ठाकरे गटही सक्रिय झाला आहे, तर पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीनेही नाव नोंदणीत आघाडी घेतली आहे.

Mumbai Politics : सर्वपक्षीयांना कोकण पदवीधर निवडणुकीचे वेध; वसई विरारची भूमिका निर्णायक
PMPML President Transfer : ‘पीएमपी’ला रुळावर आणणाऱ्या सिंह यांची अवघ्या चार महिन्यांत तडकाफडकी बदली

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपने शिंदे गटावर दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची नाराजीही अनेकदा समोर आली होती. आता पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता असून, त्यासाठी शिंदे गटाने मतदार नोंदणीवर भर दिला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा दावा पक्का करण्यासाठी ही निवडणूक शिंदे गटाला फायदेशीर ठरणार असल्याचा शिंदे गटाचा अंदाज आहे. त्याचदृष्टीने शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

पूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघावर ठाणे आणि कल्याणची भूमिका निर्णायक ठरत असे. या वेळी वसई विरारमधूनही मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. बहुजन विकास आघाडीने त्यात आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भाजप, काँग्रेस, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित करण्यात आली आहे. त्यामुळे वसई विरार परिसरातून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदवले जातील, अशी शक्यता आहे. परिणामी या वेळी उमेदवारांना नेहमीप्रमाणे फक्त ठाणे, कल्याणवर लक्ष ठेऊन वसई विरारकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

बहुजन विकास आघाडीच्या निर्णयाकडे साऱ्याच पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंत बहुजन विकास आघाडीने वसंत डावखरे आणि त्यानंतर निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. परंतु या वेळी मात्र बहुजन विकास आघाडी आपले नशीब आजमावण्याचा तयारीत असल्याचे बविआच्या गोटातून सांगण्यात येत आहे. या मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. परंतु या वेळी निरंजन डावखरे यांना निवडणुकीत मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत 'बविआ'ची भूमिका निर्णायक राहणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Mumbai Politics : सर्वपक्षीयांना कोकण पदवीधर निवडणुकीचे वेध; वसई विरारची भूमिका निर्णायक
Abdul Sattar News : मेळाव्याचे निमंत्रण द्यायला गेले अन् सत्तारांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com