Kirit Somaiya News : लग्नात आहेर म्हणून कोणाला सोन्याची बिस्किटे दिली ? सोमय्यांचा सवाल

Covid Center Scam : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सुजित पाटकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, त्यात अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
Kirit Somaiya news:
Kirit Somaiya news: Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सुजित पाटकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, त्यात अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या भागीदारांपैकी संजय शहा यांनी सोन्याचे बार, बिस्किटं आणि नाणी खरेदी केली आणि ते सुजित पाटकरांना दिले.

पाटकरांनी महापालिका अधिकारी आणि इतरांना वाटले, असा दावा ईडीने या आरोपपत्रात केला आहे. इतकेच नव्हे तर सुजित पाटकरांनी पालिका अधिकार्‍यांना रोख रकमेसह काही मौल्यवान वस्तूही दिल्याचा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

Kirit Somaiya news:
Manoj Jarange On Bhujbal : 'मराठ्यांनी छगन भुजबळला ताकद देऊ नये'; जरांगेंनी एकेरी उल्लेख करत साधला निशाणा!

"मुंबई महापालिका कोविड घोटाळ्यात लाइफलाइन कंपनीला 32 कोटी 60 लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले. त्यातल्या पार्टनरने सोन्याची बिस्किटं विकत घेतली. खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर, संजय शहा आणि बाळा कदम याची माहिती देणार का, लाखो रुपयांची सोन्याची बिस्किटं कुठल्या राजकीय नेत्याच्या मुलीच्या लग्नात गिफ्ट देण्यात आली, असे सवाल किरीट सोमय्या यांनी विचारले आहेत. याचवेळी हिसाब तो देना ही पडेगा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबईतील जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत विशेष न्यायालयात ७५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात लाइफलाइन हॉस्पिटल आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार सुजित पाटकर, डॉ. किशोर बिसुरे यांच्यासह डॉ. अरविंद सिंह, हेमंत गुप्ता, संजय शहा आदींच्या नावांचाही समावेश आहे.

जंबो कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष करण्यासाठी सुजित पाटकर यांनी ही रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू दिल्या होत्या, तर संजय शहांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमधून सुमारे साठ लाखांची सोन्याची बिस्किटे आणि बार खरेदी केले आणि पाटकरांच्या मार्फत १५ लाख रुपये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिले, असा दावा या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

दरम्यान, दहिसर कोविड केंद्रात ५० टक्के कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण पडला. सुजित पाटकर हे लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसच्या प्रमुख भागीदारांपैकी एक आहेत. ज्यांनी फर्ममध्ये केवळ १२५०० रुपयांची गुंतवणूक केली होती. पाटकर यांची या कंपनीत ३० टक्के भागीदारी आहे, असंही ईडीच्या आरोपपत्रात सांगण्यात आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Kirit Somaiya news:
Prakash Ambedkar News : ठाकरे गटासोबत तोपर्यंत बोलणी नाही, असं आंबेडकर का म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com