Eknath Shinde Land Scam : एकनाथ शिंदेंना अडकवण्यासाठी भाजप मंत्र्याचा पुढाकार? 'ती' कागदपत्रं विरोधी पक्षांपर्यंत पोहोचवली!

Land Scam Eknath Shinde BJP Minister Ganesh Naik : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी पद्धतशीरपणे भाजपचा मंत्री प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आहे. त्या मंत्र्यानेच जमीन भ्रष्टाचाराचा कागदपत्रे विरोधी पक्षांकडे पोहोचवल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Land Scam News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तब्बल 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. शिंदे मंत्री असताना त्यांनी सिडकोच्या अध्यक्षपदी शिरसाट यांनी नियुतक्ती करून कोट्यवधीची जमिन बिवलकर कुटुंबला दिली. रोहित पवार यांनी या संदर्भात भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून जमिनीचा व्यवहार झालेली कागदपत्रे सादर केली.

विरोधी पक्षाकडे नेमकी कागदपत्रे आली कशी? याची चर्चा सुरू असताना भाजपच्या एका मोठ्या मंत्र्यानेच ही कागदपत्रे विरोधी पक्षांपर्यंत पोहोचवल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे अडचणीत कसे येतील हे ते पाहत असल्याचे देखील बोलले जात आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून ही कागदपत्रे विरोधी पक्षनेत्यांकडे पोहोचली का? असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकारांनी केला असता त्यांनी यावर उत्तर देताने म्हटले की, मला माहीत नाही. मुळात 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय की नाही याचे उत्तर दिले पाहिजे. बेकायदेशीर पद्धतीने बिवलकर कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचेआदेश डावलून ते कायदेशीर हक्कदार नसताना पाच हजार एकर जमीनीतून जमीन देण्यात आली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Amit Shah News : अमित शहांनी अटक होण्यापूर्वी खरंच दिला नव्हता का राजीनामा? किती महिने होते जेलमध्ये?

नाईक विरुद्ध शिंदे वाद

गणेश नाईक यांनी मंत्रि‍पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून ठाण्यात भाजपचा विस्तार करण्यावर भर दिला आहे. त्यांनी ठाणे शहरात जनता दरबार आयोजित करून शिंदेंच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील त्यांनी ठाण्याच्या लोकसभा जागेवर भाजपचा दावा असल्याचे सांगत शिंदेंशी पंगा घेतला होता.

भ्रष्टाचाराचे प्रकरण नेमके काय?

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे तब्बल 4 हजार 078 एकर सरकाच्या ताब्यातील वनजमीन बिवलकर कुटुंबाकडे बेकायदेशीरपणे देण्यात आली. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 25 दिवसांसाठी सिडको अध्यक्षपदी संजय सिरसाट यांनी घाई घाईने नियुक्ती केली. यामध्ये 50 हजार कोटींचा घोटाळ करत दिल्लीतील एका मोठ्या नेत्याला 10 हजार कोटी पाठवण्यात आल्याचेही राऊत म्हणाले होते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Vaishali Suryawanshi BJP : वैशाली सूर्यवंशींनी भाजपचा झेंडा हाती घेताच वारे बदलले, कुणाची अडचण होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com