Eknath Shinde News : ठाणे अन् कल्याण मतदारसंघात शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

Latest Political News : पुणे जिल्ह्यात अजित पवार तर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंचा दोन जागी कस लागणार, राजकीय भवितव्यही ठरणार.
Eknath Shinde Naresh Maske Shrikant Shinde
Eknath Shinde Naresh Maske Shrikant ShindeSarkarnama

Lok Sabha Election 2024 : गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे होत असलेली लोकसभा निवडणूक कधी नाही ती अनेकांच्या प्रतिष्ठेची आणि राजकीय भवितव्याची ठरणार आहे. त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याची दिशा या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.

खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोण याचा फैसला जनतेच्या न्यायालयात प्रथमच या दोन्ही पक्षात झालेल्या फाटाफुटीनंतर होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची सुद्धा प्रतिष्ठा या निवडणुकीत पणास लागली आहे. फक्त त्यांना या निवडणुकीच्या निकालाने तेवढा फटका बसणार नाही, जेवढा तो शिंदे आणि अजितदादांना बसणार आहे. कारण ठाणे जिल्ह्यात डॉ.श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) ,तर पुणे जिल्ह्यात (बारामती) अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar ) या लोकसभेच्या उमेदवार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेत (Shivsena) बंड करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार घालविण्यास कारणीभूत ठरलेले एकनाथ शिंदे यांचा कस या लोकसभा निवडणुकीत त्यांचे होमटाऊन ठाणे जिल्ह्यात आणि त्यातही ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा जागी लागणार आहे. कारण कल्याणमध्ये त्यांचा मुलगा हा खासदारकीच्या हॅटट्रिकवर आहे. त्यामुळे ती करून आपली शिवसेना हीच खरी शिवसेना हे त्यांना सिद्ध करता येणार आहे. दिवंगत आनंद दिघेनंतर (Anand Dighe) ठाणे जिल्हा हा आपलाच बालेकिल्ला आहे, हे ही त्यांना शाबीत करता येणार आहेत. त्यामुळेच त्यांनी ठाण्यातही आपले कट्टर समर्थक नरेश म्हस्के यांनाच उमेदवारी दिली. त्यासाठी व मुलाच्या तिकिटाकरिता त्यांनी प्रतिष्ठा पणास लावली. परिणामी या दोन ठिकाणी उमेदवारी अगदी शेवटी जाहीर झाली..

ठाणे,कल्याण जिंकले,तर शिंदेंची विधानसभा निवडणुकीत बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. भाजपकडून लोकसभेच्या तुलनेत जादा जागा विधानसभेला मागता येणार आहे. त्यातून उमेदवारीचे गुऱ्हाळ लोकसभेसारखे लांबले जाणार नाही. तसेच दिल्लीतील वटही कायम ठेवता येणार आहे. अशीच अवस्था उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही आहे. त्यांनाही पत्नी उमेदवार असलेली बारामती जिंकायची आहे. त्याजोडीने आपली साथ सोडून मोठ्या साहेबांकडे गेलेले शिरुरमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) पराभवासाठी आय़ात केलेले तेथील माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांना विजयी करायचे आहे. latest update on thane kalyan loksabha election.

Eknath Shinde Naresh Maske Shrikant Shinde
Jitendra Awhad News : 'गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला'; जितेंद्र आव्हाडांचा आरोप !

राज्यातील अनेक मतदारसंघात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीतच NCP लढत होत आहे. त्यातही पुणे जिल्ह्यातील दोन ठिकाणी होत असलेली ही लढाई थेट शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही पवारांतच एकप्रकारे होऊ घातली आहे. त्यामुळे तेथे त्यांनी आपले संपूर्ण राजकीय कारकिर्द, कसब, कौशल्य पणास लावले आहे. कारण तेथील निकाल हा त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल हे ठरवणार आहे. निकाल अनुकूल लागला तर, त्यांना मोठा बूस्टर डोस मिळणार आहे, अन्यथा पुढील राजकीय वाटचाल ही अत्यंत बिकट होणार आहे.

Eknath Shinde Naresh Maske Shrikant Shinde
Sanjay Nirupam News : काँग्रेसचा हात सोडणाऱ्या संजय निरुपमांचं ठरलं, तब्बल 20 वर्षांनी स्वगृही परतणार

दोन्ही पवारांची त्यातही अजितदादांची प्रतिष्ठा, पत आणि राजकीय भवितव्यही पणास लागलेली पहिली जागा ही शिरुरची आहे. कारण तेथील उमेदवार कोल्हेंच्या पराजयाचा विडा त्यांनी उचललेला आहे. त्यामुळे त्यांना तेथे आपल्या उमेदवाराला निवडून आणणे भागच आहे. नाही, तर तोंड दाखवायला त्यांना जागा राहणार नाही. तर, दुसरीकडे तेथे शरद पवार यांना आपले पट्टशिष्य कोल्हेंना विजयी करायचे आहे. त्याजोडीने बारामतीतून आपल्या लेकीलाही विजय मिळवून द्यायचा आहे. त्यातून त्यांना एका बाणातून दोन शिकार करायच्या आहेत. अजित पवारांना त्यांची जागा दाखवून द्यायची, तर आहेच. शिवाय पुणे जिल्हा हा आपलाच बालेकिल्ला आहे, हे ही सिद्ध करायचे आहे.

शिरुरपेक्षाही Shirur बारामतीची लढत ही दोन्ही पवारांसाठी आपले कौशल्य आणि ताकद आणि कस दाखविणारी ठरणार आहे. कारण तेथे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे Supriya Sule, तर अजित पवारांची पत्नी सुनेत्रा या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणून आघाडी आणि युतीकडून उमेदवार आहेत. त्यामुळे तेथे दोन्ही पवारांना विजय हा मस्ट आहे. मात्र, तो एकाचाच होणार आहे. तर, त्यातून दुसऱ्याची प्रतिष्ठा आणि राजकीय भवितव्यावर प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरीकडे या दोन्ही ठिकाणी उमेदवारांच्या दृष्टीनेही ही निवडणूक खूप महत्वाची आणि आपल्या पुढील राजकीय भविष्याला कलाटणी देणारी असणार आहे. कोल्हे आणि सुळेंना जागाच नाही, तर आपल्या गॉडफादरची पतही टिकवायची आहे. कोल्हेंचे प्रतिस्पर्धी आढळरावांना 2019 च्या पराभवाचा वचपा काढायचा असून सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंची खासदारकी हुकवून ती स्वतःकडे घ्यायची आहे.

Eknath Shinde Naresh Maske Shrikant Shinde
Salman Khan : सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीचा आधी आत्महत्येचा प्रयत्न अन् उपचारावेळी मृत्यू....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com