Jitendra Awhad News : 'गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला'; जितेंद्र आव्हाडांचा आरोप !

Thane Lok Sabha Constituency : अजित पवारांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यावर मला काहीच बोलायचं नाही..
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane News : महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही, पण आज गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला. बुधवारी आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला.

दरम्यान, निवडणुकीच्या पहिल्या टप्यानंतर 11 दिवसांनी, तर दुसऱ्या टप्प्यानंतर 4 दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र ही आकडेवारी आयोगाने आधी जाहीर केलेल्या मतदानाहून 3 ते 5.75 टक्के अधिक आहे. या टक्केवारीत घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकसभेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले आहे.या दोन्ही टप्प्यात किती मतदान झाले याची माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. आव्हाडांनी या यासंदर्भात ट्विट देखील केले आहे. पहिल्या टप्यानंतर 11 दिवसांनी, तर दुसऱ्या टप्प्यानंतर 4 दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली.निवडणूक आयोगाने इतका उशीर का केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सर्व संशयास्पद आहे, ईव्हीएम बाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad
Sanjay Nirupam News : काँग्रेसचा हात सोडणाऱ्या संजय निरुपमांचं ठरलं, तब्बल 20 वर्षांनी स्वगृही परतणार

निवडणूक आयोग मतदानाचा आकडा का देत नाही? टक्केवारीच का देते, असा प्रश्न उपस्तित करून यासंदर्भात निवडणूक आयोगाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी जे काही बोलतोय, दाखवतोय पुराव्यानिशी दाखवत असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. हिंदुत्वचा त्यांचा मार्ग फेल गेला आहे. इतर देशात लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते मात्र इथे काहीच नसून निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले झाल्याचे आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्र हा कोणी हातात आणून दिलेला नाही, अनेक हुतात्मे यासाठी झाले. महाराष्ट्र हा पोवाड्यांनी गाजला, डफावर मुंबई पेटवली. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही पण आज गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय, असा आरोप यावेळी त्यांनी केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यावर मला काही बोलायचं नाही. शरद पवार हा माझा बाप आहे.

Jitendra Awhad
Anil Parab News : ईडी चौकशीला जाताना ढसाढसा रडत होते, आता समजेल खरी शिवसेना कुणाची; परबांनी कोणाला दिलं आव्हान !

ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे फोटो झळकतात

ठाण्यात आमचे सर्व फोटो झाकले गेलेले आहेत. मात्र अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकत आहेत, निवडणूक आयोग खोटं काम करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. निवडणूक आयोग एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम लावत असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Jitendra Awhad
Sanjay Pande News : गायकवाड-निकमांना आव्हान देण्याचा निर्धार केलेल्या संजय पांडेंची ऐनवेळी माघार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com